Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Mamata Banarjee पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पराभवाचा धक्का बसला. सुवेंदू अधिकारी यांनी १५ हजार पेक्षा जास्त मतांनी ममता बॅनर्जींचा पराभव केला.
India Alliance
mamata banarjee tmcesakal
Updated on

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून तब्बल १५ वर्षांची ममता बॅनर्जींची सत्ता संपुष्टात आलीय. भाजपने एकहाती सत्ता काबीज केलीय. अद्याप संपूर्ण मतमोजणी झाली नसली तरी भाजपने निर्णायक आघाडी घेतली आहे. भाजपने १४७ हा बहुमताचा आकडा ओलांडला असून २०० पेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळवली आहे. तर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला शंभरी गाठणंही कठीण बनलं. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही पराभवाचा धक्का बसला. भवानीपूर या पारंपरिक मतदारसंघात एकेकाळचा सहकारी असणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांच्याकडूनच ममता बॅनर्जींचा दारूण पराभव झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com