ममता बॅनर्जींनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; काय केले आवाहन?

वृत्तसंस्था
Saturday, 11 January 2020

प. बंगालमध्ये आंदोलने 

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. नागरिकत्व सुधारणआ कायदा (सीएए) आणि एनआरसी संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यात सीएए आणि एनआरसीला आमचा विरोध असल्याचं ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे स्पष्ट केले. दिल्ली आणि कोलकाता दोन्ही शहरांमध्ये या कायद्यांच्या विरोधात आंदोलन सुरू असताना, ही भेट झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यात ममता म्हणाल्या, 'मी पंतप्रधान मोदींना सांगितले की, एनआरसी आणि सीएए या दोन्ही कायद्यांना आमचा विरोध आहे. सरकारने त्यावर फेर विचार करावा, असे आवाहन त्यांना करण्यात आले. त्याचबरोबर काही आर्थिक मुद्द्यांवरही पंतप्रधान मोदींशी चर्चा झाली.' तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांचं प्राबल्य असलेल्या पश्चिम बंगालमध्ये सीएए आणि एनआरसीला प्रचंड विरोध आहे. त्यामुळं ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान मोदींची बैठक महत्त्वाची मानली जात आहे. 

प. बंगालमध्ये आंदोलने 

कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोनदिवसीय पश्‍चिम बंगाल दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर वंगभूमीमध्ये आंदोलने सुरू झाली असून, तृणमूल कॉंग्रेस आणि डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांवर आज निदर्शने केली. नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिका या दोन विषयांवरून विरोधकांनी पंतप्रधानांविरोधात आंदोलनास सुरवात केली आहे. येथील उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यामध्ये डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

पोलिस भरतीसंदर्भात मोठा निर्णय; आता मैदानी चाचणीनंतर लगेच...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mamata Banerjee Meets PM Modi and Asks Him To Rethink on CAA