

Mamata Banerjee Refuses to Resign After Defeat
Esakal
पश्चिम बंगालमध्ये पराभवाचा धक्का बसल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर गंभीर आरोप केले. आमचा पक्ष हरला नाही तर पक्षाला हरवण्यात आलंय. आमची लढाई ही भाजपशी नव्हे तर निवडणूक आयोगाशी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणूक आयोगाचा वापर करून आम्हाला हरवलं असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केलाय. तसंच ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. Mamata Banerjee Alleges BJP Conspiracy