
कोलकाता: २०११ पासून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ८४० कैद्यांची सुटका झाली आहे, योग्य कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर आता आणखी ४५ कैद्यांची सुटका केली जाईल, अशी घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी केली.
सुटका झालेल्या कैद्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, तुरुंगात असताना त्यांचे चांगले वर्तन हेच या निर्णयामागील एकमेव कारण होते. '‘आमच्या सरकारने कायदेशीर प्रक्रियेद्वारे जन्मठेपेची शिक्षा भोगलेल्या अनेक कैद्यांना मुक्त केले आहे.’' असं मुख्यमंत्री म्हणाल्या.