मोदींचा एकेकाळचा चाणक्य आता ममतांना करणार मदत?

वृत्तसंस्था
Thursday, 6 June 2019

लोकसभा निवडणुकीत तृणमुल काँग्रेसला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यानंतर आता तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2021 विधानसभा निवडणुकीकरता कंबर कसली आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी, नितीश कुमार यांच्यासाठी चाणक्यची भूमिका बजावणारे प्रशांत किशोर ममतांना मदत करणार आहे. 

कोलकाता: लोकसभा निवडणुकीत तृणमुल काँग्रेसला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यानंतर आता तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2021 विधानसभा निवडणुकीकरता कंबर कसली आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी, नितीश कुमार यांच्यासाठी चाणक्यची भूमिका बजावणारे प्रशांत किशोर ममतांना मदत करणार आहे. 

प्रशांत किशोर तृणमुल काँग्रेससाठी पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखणार आहेत. कोलकातामध्ये प्रशांत किशोर आणि ममता बॅनर्जी यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्रशांत किशोर यांनी 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी भाजप, नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची रणनिती आखली. त्यानंतर भाजपला 2014मध्ये केंद्रात सत्ता मिळाली. 

प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासाठी देखील कामं केलं. त्यावेळी देखील जेडीयुनं राज्यात सत्ता मिळवली. तर, नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री झाले. प्रशांत किशोर यांच्या कामाचा आलेख पाहता ममता बॅनर्जीही आता आगामी विधानसभेसाठी प्रशांत किशोर यांच्यावर जबाबदारी सोपवणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mamata Banerjee Signs On Prashant Kishor