नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी याविषयी काय म्हणाल्या ममता बॅनर्जी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) याबाबतची जनतेची भूमिका जाणून घेण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली सार्वमत घेतले जावे, अशी मागणी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी करीत केंद्राशी संघर्षासाठी नवा मुद्दा चर्चेत आणला आहे.

कोलकता - सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) याबाबतची जनतेची भूमिका जाणून घेण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली सार्वमत घेतले जावे, अशी मागणी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी करीत केंद्राशी संघर्षासाठी नवा मुद्दा चर्चेत आणला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज सलग तिसऱ्या दिवशी नागरिकत्व कायदा आणि एनआरसीविरोधात आंदोलन केले. या वेळी केंद्र सरकारवर टीका करताना ममता म्हणाल्या की, हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यांच्यात हिंमत असेल तर या मुद्यांवर ‘यूएन’च्या देखरेखीखाली सार्वमत घ्यावे. सध्याच्या आंदोलनात हिंसाचार घडविणारे भाजपचेच कार्यकर्ते होते. मात्र, त्यांनी दुसऱ्याच समुदायाला बदनाम केले. इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या  अटकेचाही त्यांनी निेषेध केला.

देशभरात हिंसाचाराच्या घटना : वाचा दिवसभरात कोठे काय घडले!

कन्येची मते, वडिलांची सारवासारव
‘बीसीसीआय’चे अध्यक्ष सौरव गांगुली यांची कन्या साना गांगुली हिने काल नागरिकत्व कायदा आणि एनआरसीविरोधातील आपला राग इन्स्टाग्रामवर व्यक्त केला. तिने ‘एंड ऑफ इंडिया’ या खुशवंतसिंग यांच्या पुस्तकातील एक उतारा आणि सध्या आंदोलन सुरू असलेली भारतातील ठिकाणे इन्स्टाग्रामवर पोस्ट केली. इतक्‍या कमी वयात स्पष्ट मते मांडल्याबद्दल सोशल मीडियावर तिचे कौतुकही झाले. मात्र, सौरव यांनी रात्रीच ट्विट करत ‘ही पोस्ट खरी नाही. सानाला राजकारणात खेचू नका.’ असे आवाहन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mamata Banerjee spoke about citizenship law and national citizenship registration