Mamata Banerjee warned BJP : ‘’जर भाजपने बंगालमध्ये माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर...’’ ; ममता बॅनर्जींनी दिला जाहीरपणे इशारा!

Mamata Banerjee’s big Statement During SIR Protest Rally : एसआयआर विरोधी रॅलीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
Mamata Banerjee

Mamata Banerjee

sakal

Updated on

Mamata Banerjee Criticized BJP and Central Government on SIR : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी SIR वरून पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. तसेच, , "एसआयआर पूर्ण करण्यासाठी तीन वर्षे लागतात. आम्ही कधीही त्याला विरोध केला नाही; आम्ही फक्त असे म्हटले आहे की कोणत्याही खऱ्या मतदारांची नावे वगळता येणार नाहीत."

एवढच नाहीतर भाजप आपल्या कार्यालयातूनच यादी फिक्स करत असल्याचा आरोपही ममता बॅनर्जींनी केला आहे. तसेच त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हटले की, निवडणूक आयोगाचे काम निष्पक्ष राहणे आहे,  भाजप आयोग बनणे नाही. तसेच मटुआ समुदायाला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "तुम्ही सर्व खरे मतदार आहात. तुम्ही २०१४ मध्ये मोदी सरकारला मतदान केले होते. जर तुम्ही बेकायदेशीर झालात तर ते सरकारही बेकायदेशीर होईल."

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एसआयआर विरोधी रॅलीत केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. तसेचन दावा केला की बंगालमधील लोकांना एसआयआरच्या नावाखाली धमकावले जात आहे आणि ही संपूर्ण कारवाई राजकीय हेतूंसाठी केली जात आहे. त्या म्हणाल्या, "भाजप माझ्याशी माझ्याशी लढू शकत नाही, मला हरवू शकत नाही. जर भाजपने बंगालमध्ये माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर मी संपूर्ण भारतात त्यांचा पाया हादरवून टाकेन."

Mamata Banerjee
Pune Police Action against Koyta Gang Video : पुणे पोलिसांनी कोयता गँगच्या बदमाशांची जिरवली मस्ती; नागरिकांसमोरच बेदम चोपलं!

यापूर्वी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील मटुआ बहुल असलेल्या बाणगाव भागात रस्त्याने पोहोचल्या. त्यांनी भाजपवर त्यांचे हेलिकॉप्टर उड्डाण रोखण्याचा कट रचल्याचा आरोप केला आणि म्हटले की विरोधी पक्ष त्यांना येथे येऊ देऊ इच्छित नाही. तसेच, त्या कडक शब्दात असंही म्हणाल्या, "मी भाजपला वारंवार सांगते की, माझ्याशी खेळण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही कितीही एजन्सी तैनात केल्या किंवा केंद्र सरकारची संपूर्ण शक्ती वापरली तरी तुम्ही माझ्याशी खेळ खेळू शकणार नाहीत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com