esakal | West Bengal - मुख्यमंत्री ममतांचाच 'खेला', भवानीपूरमध्ये भाजपचा पराभव
sakal

बोलून बातमी शोधा

West Bengal CM Mamata Banerjee

मुख्यमंत्री ममतांचाच 'खेला', भवानीपूरमध्ये भाजपचा पराभव

sakal_logo
By
सुधीर काकडे

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज भवानीपूर मतदार संघात विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या प्रियांका टिबरेवाल यांच्या विरोधात ५८,८३२ मतांची आघाडी मिळवली आहे. भारतीय जनता पक्ष आणि तृणमुल काँग्रेस या दोन्हीही पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती. यावर्षी मार्च मध्ये झालेल्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना पराभव मिळाला होता. भाजपचे सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींपेक्षा जास्त मतं मिळवत त्यांना पराभुत केलं होतं.

हेही वाचा: विजयानंतर ममतांची तिखट प्रतिक्रीया; भाजपला लगावला टोला

बंगालमध्ये निवडणुका सुरू झाल्यापासून केंद्र सरकारने आम्हाला सत्तेवरून हटवण्यासाठी कट रचले. आपण निवडणूक लढवू नये कारस्थान केले त्यात आपल्या पायाला दुखापत झाली. मात्र 6 महिन्यांच्या आत निवडणुका आयोजित केल्याबद्दल निवडणुक आयोगाला तसेच मतदान केल्याबद्दल आपण जनतेचे आभारी आहोत, अशी तिखट प्रतिक्रीया देत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला टोला लगावला.

एप्रिल २०२१ मध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकांमध्ये भाजप आणि तृणमुल काँग्रसे या दोन्ही पक्षांत मोठ्या चुरशीची लढाई पाहायला मिळाली होती. या निवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पराभव स्विकारावा लागला होता. मोठ्या प्रमाणात झालेल्या भाजप आणि तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधील वादामुळे निवडणुकीनंतर बंगालध्ये मोठा हिंसाचार झाला होता.

loading image
go to top