
ममतांनी राज्यपालांना केलं ट्विटरवर ब्लॉक; केला गंभीर आरोप
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी राज्यपाल जगदीप धनखड (Jaydeep Dhankad) यांच्यातील तणाव कमी होण्याची चिन्ह नाहीत. कारण आता ममतांनी राज्यपालांना थेट ट्विटरवर ब्लॉकच केलं आहे. राज्यपालांच्या ट्विट्समुळं वैतागून आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे आपण अनेकदा पत्र लिहून राज्यपालांना हटवण्याची मागणी केली होती, पण यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. (Mamata blocks governor on Twitter Made serious allegations)
हेही वाचा: विद्यार्थ्यांनी चर्चा करावी, आंदोलन हे शेवटचं पाऊल - वर्षा गायकवाड
ममतांचा आरोप काय?
ममतांनी राज्यपाल धनखड यांच्यावर आरोप करताना सांगितलं की, राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना (डीजीपी) धमकावण्याचं काम करत होते. ममतांनी असाही आरोप केला की, राज्यपाल धनखड ट्विट्सच्या माध्यमातून सरकारी अधिकाऱ्यांना अशा पद्धतीनं धमकावत होते की, जसे ते त्यांचे बिगारी कामगार आहेत.
राज्य सरकारवर राज्यापलांची सातत्यानं टीका
पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर निशाणा साधत आहेत. नुकतंच त्यांनी राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप लावला. त्यांनी माँ कॅन्टिन आणि कोरोना महामारीच्या काळात केल्या गेलेल्या नियोजनात घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
इतकंच नव्हे तर महात्मा गांधींच्या पुण्यतिथीदिनीच राज्यपालांनी ममतांच्या सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी म्हटलं की, राज्य सरकार बंगालमधील लोकशाहीला गॅसच चेंबर बनवलं आहे. या राज्यात लोकशाहीचा श्वास कोंडतो आहे. इथं कायद्याचं राज्य नव्हे तर राज्यकर्त्याचा कायदा आहे. इथलं राजकारण रक्तरंजित झालं असून संविधानाची रक्षा करणं माझं कर्तव्य आहे.
Web Title: Mamata Blocks Governor On Twitter Made Serious Allegations
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..