Mamata Banerjee : पुतण्याच्या बचावासाठीच ममतांकडून मोदींचं कौतुक; भाजपचा खोचक टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mamata Banerjee

Mamata Banerjee : पुतण्याच्या बचावासाठीच ममतांकडून मोदींचं कौतुक; भाजपचा खोचक टोला

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) सतत टीका करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांच्या दुरुपयोगामागं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हात असावा असं मला वाटत नाही, असं ममता यांनी म्हटलंय. विरोधक टीका करत असताना ममता यांनी एकप्रकारे मोदींचं कौतुक केल्याचं समोर आलं आहे. (Mamata Banerjee news in Marathi)

हेही वाचा: डॉक्टरने होणाऱ्या बायकोचे न्यूड फोटो केले पोस्ट; संतप्त पीडितेने भावी नवऱ्याला संपवलं

यावर भाजपकडून प्रतिक्रिया आली आहे. ममता बॅनर्जी यांनी केलेलं कौतुक भाजपला आवडलं नसल्याचं समोर आलं आहे. आपला पुतण्या तुरुंगात जाण्याची भीती वाटत, असल्याने ममतांचा टोन बदलल्याचं भाजपने म्हटलं आहे. शिवाय एजन्सींच्या संचालकाचे प्रमुख CJI, PM आणि विरोधी पक्षनेते ठरवतात. मग ममता बॅनर्जी हे कसे म्हणू शकतात की भाजपकडून ईडीचा गैरवापर होतोय.

तत्पूर्वी सोमवारी पश्चिम बंगालच्या विधानसभेत एक ठराव मंजूर करण्यात आला होता. यामध्ये ईडीच्या प्रवेशाला विरोध करण्यात आला होता. यानंतर ममता यांनी मीडियाला सांगितले की, मला वाटत नाही की पीएम मोदी एजन्सीचा गैरवापर करत आहेत. भाजपचे काही नेते आपल्या अहंकारामुळे विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य करत आहेत.

हेही वाचा: Video : बेकाबू झालेल्या चाहतीला गायकाने स्टेजवरच केले लिपकिस; व्हिडिओने खळबळ

ममता यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधानांचा या प्रकरणांमध्ये काहीही संबंध नाही. यावरून भाजप आमदार अग्निमित्रा पॉल यांनी ममता यांची खिल्ली उडवत, सूर अचानक का बदलला असा सवाल केला आहे.

Web Title: Mamata Changed Her Stance On Pm Modi Mentioning Abhishek Bengal Bjp Slams Her

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpMamata BanerjeeTMC