
भाजप हा लोकांना बंदुका आणि गोळ्यांचा धाक दाखवून धर्माच्या नावावर देशात फूट पाडणाऱ्यांचा पक्ष असल्याचे टीकास्त्रही ममतांनी या वेळी डागले. नादिया जिल्ह्यातील कृष्णनगर येथील तृणमूल काँग्रेसच्या सभेत ममता बोलत होत्या. या वेळी त्यांनी भाजपवर टीका केली.
कृष्णनगर (पश्चिम बंगाल) - भारतीय जनता पक्षा (भाजप) हा ‘फेकूं’चा पक्ष असल्याची घणाघाती टीका आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
भाजप हा लोकांना बंदुका आणि गोळ्यांचा धाक दाखवून धर्माच्या नावावर देशात फूट पाडणाऱ्यांचा पक्ष असल्याचे टीकास्त्रही ममतांनी या वेळी डागले. नादिया जिल्ह्यातील कृष्णनगर येथील तृणमूल काँग्रेसच्या सभेत ममता बोलत होत्या. या वेळी त्यांनी भाजपवर टीका केली. भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्लीतील प्रचारसभेत बोलताना ‘देश के गद्दारों को, गोली मारो सालो को’ अशी घोषणाबाजी केली. त्या पार्श्वभूमीवर ममता यांनी आज ठाकूर यांचे नाव न घेता निशाणा साधला. घटनात्मकपदावर असताना केंद्रीय मंत्री घटनाविरोधी वक्तव्ये कशी काय करू शकतो, असा प्रश्न ममता यांनी उपस्थित केला.