Video : माझं बाळ मला हवयं हो, मातेची आर्त हाक...

वृत्तसंस्था
Wednesday, 9 October 2019

मुरादाबाद (उत्तर प्रदेश) : आठ महिन्यांचे बाळ आईच्या कुशीत झोपले होते. दोघे जण आले, बाळाला उचलले आणि निघून गेले. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

मुरादाबाद (उत्तर प्रदेश) : आठ महिन्यांचे बाळ आईच्या कुशीत झोपले होते. दोघे जण आले, बाळाला उचलले आणि निघून गेले. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

गलशहीद स्टेशन क्षेत्र परिसरातील रोडवेज बस स्थानकात ही घटना घडली आहे. मातेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, पोलिस सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन आरोपींचा शोध घेत आहेत. पती-पत्नीमध्ये भांडण झाल्यामुळे पत्नी बाळाला घेऊन बसस्थानकावर झोपली होती. यावेळी एका जोडप्याने महिलेशी ओळख निर्माण केली. मात्र, झोपेत असताना त्यांनी बाळाला घेऊन पळ काढला. महिलेला जाग आल्यानंतर बाळाचे अपहरण झाल्याचे लक्षात आले. बाळाचे अपहरण झाल्यानंतर मातेने फोडलेला टाहो पाहून अनेकांचे मन हेलावले.

पोलिस अधीक्षक अंकीत मित्तल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बस स्थानकात महिला आपल्या बाळाला घेऊन झोपली होती. यावेळी एक जोडपे आले व त्यांनी बाळाला घेऊन निघून गेले. महिलेने केलेल्या तक्रारीनंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. आरोपींची ओळख पटली आहे. दोघेही फरार असून, त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man and woman captured on CCTV while abducting 8 month old from bus stand in Uttar Pradesh