
कोरोना संकटात अनेक जणांना नोकरी गमवावी लागली. त्याचीही नोकरी गेली. आणि तो चोरीकडे वळला. जीव वाचवण्यासाठी जो मास्क आता अनिवार्य झालाय त्या मास्कचा वापर तो जगण्यासाठी चोरी करायला करु लागला.
कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर मास्कचा वापर हा अनिवार्य झाला आहे. घरातून बाहेर पडताना प्रत्येकाने मास्क वापरावा, अशा सूचना सरकारनेही नागरिकांना केल्या आहेत. सुरक्षितेतासाठी होत असलेल्या मास्कच्या वापरामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. चोरांना ओळखून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांना कस लागत आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन मॉलमध्ये लूट करणाऱ्या चोरी करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. पश्चिम बंगालमधील कोलकाताच्या मॉलमध्ये हा सर्व प्रकार घडला. संबंधित व्यक्तीने चेहऱ्यावर मास्क बांधून चोरी तर केली मात्र त्याची चोरी पकडली गेली. पोलिसांनी त्याला घरातून अटक केली.
संबंधित चोरट्या व्यक्तीचं नाव रतन भट्टाचार्य असून तो कोलकाता येथील झिंझिरा बाजार परिसरात राहत असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. कोरोनाच्या संकटापूर्वी ही व्यक्ती सुरक्षा रक्षकाचे (Security guard) काम करायचा. पण कोरोना संकटात अनेक जणांना नोकरी गमवावी लागली. त्याचीही नोकरी गेली. आणि तो चोरीकडे वळला. जीव वाचवण्यासाठी जो मास्क आता अनिवार्य झालाय त्या मास्कचा वापर तो जगण्यासाठी चोरी करायला करु लागला.
दारुच्या नशेत पोलिसांना केला फोन, पंतप्रधानांना दिली जीवे मारण्याची धमकी
25 डिसेंबर 2020 किडरपोर मॉलमध्ये एक महिला शॉपिंग करत होती. तिचे लक्ष नसल्याचे पाहून त्याने या महिलेची पर्स चोरी केली. महिलेच्या पर्समध्ये 10 अमेरिकन डॉलर आणि 700 युरोसह 99,300 रुपये होते. मॉलमधून पळ काढताना त्याने मास्क खाली खेचला होता. यावेळी तो CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांनी त्याला त्याच्या निवास्थानी जाऊन अटक केली.
महाराष्ट्रातही घडली होती अशीच घटना
राज्यातील नाशिकममधील एका भाजी विक्रेत्याला अशाच प्रकारच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. 39 वर्षीय भाजी विक्रेत्याने कथित स्वरुपात कल्याणमध्ये घरफोडी केली होती. भाजी विकत असताना परिसराची रेखी करुन घरफोडीचा प्लॅन आखत असल्याचे तपासातून समोर आले होते. CCTV फूटेजच्या माध्यमातून या चोरालाही पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून 6.75 लाख रुपये आणि 150 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले होते.