तरुणाचा मारहाणीत मृत्यू; घराबाहेर आंबेडकर यांच्या पोस्टरवरून झाला होता वाद

rajasthan
rajasthan
Summary

राजस्थानमधील हनुमानगढ जिल्ह्यातील एका गावात दलित तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाला आहे

जयपूर - राजस्थानमधील हनुमानगढ जिल्ह्यातील एका गावात दलित तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाला आहे. तरुणाच्या मृत्यूप्रकरणी ओबीसी समजाच्या काही लोकांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. तरुण जखमी झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्याचा बुधवारी मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, मृत तरुण किकरालिया गावातील असून तो भीम आर्मीचा सदस्य होता.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, विनोद बामनिया असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी पीडीत कुटुंबियाच्या तक्रारीनंतर चार संशयित आऱोपींपैकी दोघांना अटक केली आहे. दोघांवर पोस्टर फाडण्याचा आणि तरुणाला मारहणा करण्याचा आरोप आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी तरुणाला मारहाण करत जातिवाच टिप्पणी केल्याचाही आरोप पीडित कुटुंबियांनी केला आहे.

rajasthan
Corona - भारतात एका दिवसात 6 हजार मृत्यू कसे?

पोलिसांनी सांगितले की, मृत्यू झालेल्या तरुणाने याआधीही वेगवेगळ्या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी विनोदच्या नातेवाईकांनी असं म्हटलं की, विनोदला झालेली मारहाण ही त्याने केलेल्या तक्रारीमुळे झाली आहे. विनोदने याआधी इतर तरुणांसोबत मिळून आंबेडकर जयंती साजरी केली होती. तसंच घराबाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर लावले होते. त्यानंतर आरोपींनी पोस्टर फाडले आणि वाद सुरु झाला.

संशयित आरोपींविरुद्ध आयपीसी कलम 307, 323, 341, 143 आणि SC-ST अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विनोदच्या मृत्यूनंतर पोलिसांनी 307 ऐवजी 302 कलम लावलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com