esakal | अख्खा पगार देत नाही म्हणून CA असलेल्या पत्नीला नवऱ्याकडून मारहाण | domestic violence
sakal

बोलून बातमी शोधा

Women

अख्खा पगार देत नाही म्हणून CA असलेल्या पत्नीला नवऱ्याकडून मारहाण

sakal_logo
By
दीनानाथ परब

अहमदाबाद: महिलांवर होणारे अत्याचार, हिंसाचार (violence)रोखण्यासाठी कठोर कायदे करण्यात आले आहेत. पण अजूनही महिलांविरोधात घडणारे गुन्हे कमी झालेले नाहीत. (Crime against women) छोट्या, छोट्या घरगुती कारणांवरुन महिलांना मारहाण होण्याचे प्रकार आजही घडतात. पत्नी नोकरी करणारी असेल, तर घरगुती भांडणांमध्ये तिची कमाई सुद्धा वादाचा विषय असतो. अशीच एक घटना गुजरातच्या अहमदाबादमधील नाना चिलोडा भागात समोर आली आहे.

महिलेने पतीविरोधात पोलीस ठाण्यात घरगुती हिंसाचाराची तक्रार नोंदवली आहे. महिलेने पतीविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेण्याचे कारण आहे, तिचे वेतन. महिलेचा पती तिचे महिन्याचे अख्खे वेतन स्वत:कडे ठेऊन घ्यायचा. तिने काही आक्षेप घेतला, तर तिला बेदम मारहाण केली जायची. महत्त्वाचं म्हणजे पतीकडून मारहाण सहन करणारी ही महिला उच्चशिक्षित आहे. पेशाने ती ‘चार्टर्ड अकाऊंटट’ आहे. तिचे ऑगस्ट २०१८ मध्ये लग्न झाले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: राज्याच्या मंत्रिमंडळाचा होणार विस्तार अन्‌ खांदेपालट

महिलेचा पती एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. लग्नानंतर त्याने पत्नीला महिन्याचे संपूर्ण वेतन तुला मला द्यावे लागेल, असे सांगितले. "जेव्हा मी अर्धा पगार दिला, तेव्हा नवऱ्याने मला अमानुषपणे मारहाण केली. मी पैशांसाठी तुझ्याबरोबर लग्न केलेय असे सांगितले. यापुढे पगार दिला नाहीस, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली" असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा: शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांना हलवलं दुसऱ्या रुग्णालयात

जानेवारी २०१९ मध्ये हे जोडपे परदेशी गेले होते. त्यावेळी सुद्धा नवरा आपल्याला मारहाण करायचा असा आरोप महिलेने केला आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात जोडपं भारतात परत आलं. त्यावेळी सुद्धा पैशावरुन नवरा मला मारहाण करायचा असे महिलेने म्हटले आहे.

loading image
go to top