esakal | राज्याच्या मंत्रिमंडळाचा होणार विस्तार अन्‌ खांदेपालट ! cabinet expansion
sakal

बोलून बातमी शोधा

राज्याच्या मंत्रिमंडळाचा होणार विस्तार अन्‌ खांदेपालट

ओबीसी आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप सुरु असून कोणाताही मंत्री अन्य विभागाच्या कामकाजात ढवळाढवळ करु लागल्याची चर्चा आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळाचा होणार विस्तार अन्‌ खांदेपालट

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: राज्याच्या महाविकास आघाडीतील वनमंत्री संजय राठोड, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनिल देशमुख यांना विविध कारणांवरून राजीनामा द्यावा लागला. दुसरीकडे शिवसेनेतील अनिल परब, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हसन मुश्रिफ यांच्याबद्दल आता विरोधकांकडून भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. ओबीसी आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप सुरु असून कोणाताही मंत्री अन्य विभागाच्या कामकाजात ढवळाढवळ करु लागल्याची चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर मंत्रिमंडळात खांदेपालट होण्याची दाट शक्‍यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर काही महिन्यांत मंत्रिमंडळ विस्तारदेखील होऊ शकतो, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्‍त केला जातोय. कॉंग्रेसच्या वाट्याला येणारे विधानसभेचे अध्यक्षपदही रिक्‍त आहे. या सर्व बाबींचा विचार करता आमदार प्रणिती शिंदे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल, असाही अंदाज वर्तविला जात आहे. परंतु, महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये यश मिळवणे अपेक्षित आहे.

हेही वाचा: सोलापूर: 'आरटीओ' संजय डोळे सेवानिवृत्त

सत्तेपासून भाजपला दूर ठेवत राज्यात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. मात्र, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तसा करिष्मा होण्याची शक्‍यता धूसर आहे. त्यामुळे इतर पक्षातील नाराज असलेल्या तुल्यबळ नेत्यांना आपलेसे करण्याची रणनिती राष्ट्रवादीने आखली आहे. अनेक नेतेमंडळी राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चिंता कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना सतावू लागली. त्यामुळे महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय झाल्यास महापौरपदापर्यंत पक्षाची ताकद पोहणार नाही, या जाणिवेतून सांगलीचे विश्‍वजीत कदम व कोल्हापूरचे सतेज पाटील यांनी नुकतेच दौरे केल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा: सोलापूर: 31 वर्षांत चौथ्यांदा भरला हिप्परगा तलाव

फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी होईल की नाही, याबाबत प्रश्‍नचिन्ह कायम आहे. महापालिकेत मागील वर्षीच्या तुलनेत कॉंग्रेसच्या नगरसेवकांची खूपच संख्या कमी आहे. शहरात राष्ट्रवादी हा प्रबळ पक्ष असून आता एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक तौफिक शेख, वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश प्रवक्‍ते आनंद चंदनशिवे, शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनीही राष्ट्रवादीची वाट धरल्याने तो पक्ष आणखी मजबूत होणार आहे. त्यांच्या साथीला करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनीही महापालिका निवडणुकीत लक्ष द्यायला सुरवात केली आहे. पालकमंत्रीदेखील राष्ट्रवादीचाच असल्याने आपण निश्‍चितपणे सत्तेपर्यंत (महापौर) पोहचणार नाही, असे कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांमध्येच चर्चा आहे. दुसरीकडे, सुशिलकुमार शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर ग्रामीण दौरे कमी केल्याचे बोलले जात आहे. जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील हेही आता नवीनच आहेत. त्यामुळे शहर-ग्रामीणची संपूर्ण धुरा आमदार प्रणिती शिंदे यांना सांभाळावी लागणार आहे. मात्र, तुल्यबळ विरोधकांमुळे त्यांना शहरातून बाहेर पडायला वेळच मिळत नसल्याची स्थिती आहे. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह यावा म्हणून मंत्री सतेज पाटील व विश्‍वजीत कदम यांनी नुकतेच सोलापूर दौरे केल्याची चर्चा आहे.

हेही वाचा: पुणे-सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस 17 ऑक्टोबर पर्यंत रद्द

महापालिकेसाठी सिध्दाराम म्हेत्रेंची मदत

सोलापूर शहरात पद्मशाली, लिंगायत समाजाचे मोठे प्राबल्य आहे. महेश कोठे हे दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर त्यांनी कॉंग्रेसलाच आव्हान दिले. श्री सिध्देश्‍वर साखर कारखान्याच्या चिमणीमुळे धर्मराज काडादी यांना कोणत्या एका पक्षाला साथ देणे परवडणारे नाही. निवडणुकीच्या प्रचारासाठी माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह शहरातील कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत सातत्याने असणारे माजी आमदार दिलीप माने यांनीही पक्ष बदलला आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी माजी राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांची मदत घेतली जात असल्याचे बोलले जात आहे.

loading image
go to top