धक्कादायक! अवघ्या ५०० रुपयांसाठी शिर कापले अन् ते घेऊन पोहचला थेट पोलीस ठाण्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murder case

धक्कादायक! अवघ्या ५०० रुपयांसाठी शिर कापले अन् ते घेऊन पोहचला थेट पोलीस ठाण्यात

फुटबॉल सामन्यासाठी अवघ्या 500 रुपयांच्या अटीवरून झालेल्या वादानंतर आसाममध्ये एका व्यक्तीने आपल्याच गावातील एका व्यक्तीचा शिर कापून खून केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या क्रूर कृत्यानंतर तो सुमारे 25 किलोमीटर दूर असलेल्या पोलिस ठाण्यात गेला आणि आत्मसमर्पण केले.

ही घटना उत्तर आसाममधील सोनितपूर जिल्ह्यात सोमवारी घडली, जेव्हा स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित फुटबॉल सामना संपला होता, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेबाबत पोलीसांनी सांगितले की, मारेकऱ्याला काही काळापूर्वी शिर कापलेल्या व्यक्तीने 500 रुपयांचे कर्ज मागितले होते, परंतु त्याने नकार दिला होता.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फुटबॉल सामन्यानंतर बकरा बक्षीस म्हणून जिंकणारा आरोपी तुनिराम माद्री याने बोइला हेमराम याला त्याच्यासोबत कत्तलखान्यात जाण्यास सांगितले. हेमरामने नकार दिला. यामुळे तुनिराम माद्री संतापला आणि त्याने हेमरामवर हल्ला केला.

हेमरामची हत्या केल्यानंतर तुनिराम त्याचे छाटलेले डोके घेऊन घरी पोहोचला. तेथे त्याच्या मोठ्या भावाने त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो पळून जाण्यात यशस्वी झाला. नंतर तुनिराम माद्री यांनी 25 किमी चालत पोलीस स्टेशन गाठले आणि कापलेल्या शिरसह आत्मसमर्पण केले. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, तुनिरामने हेमरामची हत्या केलेल्या कुऱ्हाडीसारखे हत्यारही पोलिसांना दिले.

पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, "त्याला (तुनीराम माद्री) ताब्यात घेण्यात आले आहे, आणि प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे..." हेमराम आणि तुनिराम एकाच समुदायाचे आहेत.

Web Title: Man Beheads Fellow Villager Over Rs 500 Bet Walks 25 Kms To Police Station With Severed Head

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :policemurderAasam