Deoghar ropeway : बचाव कार्यादरम्यान IAFच्या हेलिकॉप्टरमधून पडून व्यक्तीचा मृत्यू

Deoghar ropeway accident
Deoghar ropeway accident
Updated on

झारखंडच्या देवघर जिल्ह्यात सुरू असलेल्या बचाव कार्यादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. रोपवेवरील काही केबल कार एकमेकांवर आदळल्याने 15 लोक अडकले होते. त्यांच्या बचावकार्यासाठी तत्काळ भारतीय वायुसेनेचे हेलिकॉप्टर रवाना करण्यात आले. यानंतर बचावकार्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक माणूस भारतीय वायुसेनेच्या (IAF) हेलिकॉप्टरमधून पडताना दिसतोय.

व्हिडीओमध्ये हा व्यक्ती हेलिकॉप्टरमधून दोरीला घट्ट पकडताना दिसत आहे. मात्र, त्याला आत खेचलं जात असतानाच तो घसरला आणि पडून त्याचा मृत्यू झाला. सोमवारी झारखंडच्या देवघर जिल्ह्यातील बाबा बैद्यनाथ मंदिराजवळ रोपवेवरील दोन केबल कारची धडक होऊन तीन जण ठार तर अनेक जण जखमी झाले. या घटनेवर दु:ख व्यक्त करताना झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले की, बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

Deoghar ropeway accident
रोप वे दुर्घटनेत २ ठार, ४८ पर्यटक अडकले; मदतीसाठी हवाई दल पोहोचले

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बचाव कार्याबद्दल चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Premium Ingredients: The Royal Touch of Desi Ghee, Fresh Green Peas, and Aromatic Spices
Why did India waive cotton import duty?
Latest Marathi News Live Update
IMD monsoon delay forecast for India 2026
Marathi News Esakal
www.esakal.com