हॅलो, सनी लिओनी; प्लिज व्हिडिओ भेजो ना...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

हॅलो, सनी लिओनी; प्लिज आपके वो वाले व्हिडिओ भेजो ना..., देश नव्हे तर परदेशातूनही अनेकजण कॉल करत असून, अनेकजण अश्लिल बोलत आहेत.

नवी दिल्लीः हॅलो, सनी लिओनी; प्लिज आपके वो वाले व्हिडिओ भेजो ना..., असे एक ना अनेक फोन अभिनेत्री सनी लिओनी हिने शेअर केलेल्या मोबाईलवर येत आहेत. देश नव्हे तर परदेशातूनही अनेकजण कॉल करत असून, अनेकजण अश्लिल बोलत आहेत. संबंधित मोबाईल क्रमांक वापरणार युवक कंटाळला आहे.

रोहित जुगराज दिग्दर्शित 'अर्जुन पटियाला' या चित्रपटात दलजीत दोसांज, क्रिती सेनन आणि वरुण शर्मा यांची प्रमुख भूमिका असून, तो 26 जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सनी लिओनी हिची सुद्धा भूमिका आहे. चित्रपटातील एका प्रसंगादरम्यान ती मोबाईल नंबर सांगते. हा नंबर दिल्लीतील पुनीत अग्रवालचा आहे. दिवसभरात त्याला शंभरहून अधिक फोन येत असून, अनेकजण सनीची विचारणा करत आहेत. मला सनीची भेट हवी आहे, म्हणून त्याच्याकडे विनंती करतात.

पुनीत म्हणाला, गेल्या 10 ते 12 वर्षांपासून तो मोबाईल क्रमांक वापरत आहे. 26 जुलैपासून मला फोन येण्यास सुरवात झाली. फोन करणारे माझ्याकडे सनी लिओनीबद्दल विचारणा करू लागले. अचानक येऊ लागलेल्या फोनमुळे मला काही समजेनासे झाले. एकाला ला का फोन करत आहात? अशी विचारणा केली असता, त्यांनी मला चित्रपटातील एक क्‍लिप पाठवली. यानंतर मी 'अर्जुन पटियाला' नावाचा हा चित्रपट पाहिला. या चित्रपटाच्या सुरुवातीच्या 15 मिनिटांमध्ये सनी लियोनी एक मोबाईल नंबर सांगते आणि हा नंबर माझाच आहे.'

'रात्री-अपरात्री फोन नुसता खणखणत असतो. दररोजच्या फोनला कंटाळलो आहे. शांतपणे झोपूह शकत नाही. फोन करणारे मला काहीही विचारतात. व्हॉट्सऍपवरही अनेकजण मेसेजेस पाठवत आहेत. काही जण अश्लिल क्लिपचीही मागणी करतात. माझी ओळख तर आता दिल्लीचा सनी म्हणून झाली आहे. या त्रासाला कंटाळून मी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि माझा नंबर बोलणाऱ्या अभिनेत्रीविरोधात 28 जुलै रोजी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी मला नंबर बदलण्याचा सल्ला दिला. पण, हे शक्‍य नाही. गेल्या 10 ते 12 वर्षांपासून हा नंबर वापरत असून, विविध ठिकाणी हा नंबर आहे. न्यायालयाचे जाणार असून, लवकरात लवकर सुनावणी होईल,' असेही पुनीत म्हणाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man flooded with calls after Sunny shares her mobile number in film