
पॉर्न व्हिडिओत पत्नी असल्याचा संशय, मुलांसमोरच केली हत्या
बंगळुरू : पॉर्न पाहण्याचे व्यसन असलेल्या एका ४० वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली. आपली पत्नी पॉर्नमध्ये काम करत असल्याचा संशय त्याला होता. त्यामधून ही हत्या करण्यात आली आहे. कर्नाटकातील बंगळुरूमध्ये (Bengaluru) ही घटना घडली.
हेही वाचा: पिंपरीत 9 वर्षांच्या मुलाची डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून हत्या
जहीर पाशा, असे आरोपीचे नाव असून रिक्षाचालक आहे. तसेच मुनीबा असे त्याच्या पत्नीचे नाव होते. पाशा आणि मुनीबा मूळचे बंगळुरूचे (Bengaluru) असून त्यांच्या लग्नाला १५ वर्षे झाली होती. त्यांना पाच मुले आहेत. त्याने सुमारे दोन महिन्यांपूर्वी एक पॉर्न व्हिडिओ पाहिला. त्यामध्ये त्याची पत्नी मुनीबा असल्याचा संशय त्याला आला. पत्नीच्या निष्ठेबद्दल शंका आल्याने त्याने तिला त्रास देण्यास सुरुवात केली.
दोन महिन्यांपूर्वी कौटुंबिक कार्यक्रमात पाशाने मुनीबाला मारहाण केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी चौकशी केली असता पाशा तिचा छळ करत असल्याचे समजले. गेल्या २० दिवसांपूर्वी देखील पाशाने मुनीबाला मारहाण केली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यावेळी मुनीबाच्या वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार देण्यासाठी धाव घेतली होती. पण, मुनीबाने वडिलांना तक्रार दाखल करण्यापासून रोखले होते.
मुलांसमोरच केली हत्या -
पाशाने रविवारी सकाळी पाचही मुलांसमोर मुनीबाची हत्या केली. त्यानंतर एका मुलाने आजोबांच्या घरी धाव घेत आईची हत्या केल्याची माहिती दिली. त्यानंतर मुनीबाच्या वडिलांनी घरी धाव घेतली असता मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
Web Title: Man Killed Wife Assumed Work In Porn Movie Bengaluru
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..