MP Mass Murder: कुऱ्हाडीने वार करुन कुटुंबातील 8 जणांची हत्या, नंतर फाशी घेऊन संपवलं जीवन

Man Kills 8 Family Members: आरोपीने आधी पत्नीवर कुऱ्हाडीने वार केला, त्यानंतर आई-बहीण, भाऊ-वहिनी आणि दोन भाची-पुतणे यांची केली हत्या आहे.
MP crime
MP crime

भोपाळ: मध्य प्रदेशातील छिंदवाडामधे मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका युवकाने आपल्या कुटुंबातील 8 जणांची हत्या करून स्वतः फाशी घेत आत्महत्या केली आहे. आरोपीने आधी पत्नीवर कुऱ्हाडीने वार केला, त्यानंतर आई-बहीण, भाऊ-वहिनी आणि दोन भाची-पुतणे यांची केली हत्या आहे.

एवढेच नाही, मामाच्या घरी जात त्याने 10 वर्षाच्या मुलीवर हल्ला केला मात्र ती पळून गेल्याने तिचा जीव वाचला. आरोपीने हत्या का केली याच कारण अद्याप अस्पष्ट आहे. पण, त्याचे पत्नीसोबत भांडण झाल्याचे सांगितले जाते. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केलाय. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही घटनास्थळी भेट देत निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश दिलेत

MP crime
Crime News : मोबाईल रिचार्ज करायला गेले ते परत आलेच नाही; वडिलांचा सापडला रक्ताळलेला मृतदेह

महुलजिर पोलीस स्टेशन हद्दीतील आदिवासी बहुल बोदल कचार गावातील ही घटना आहे. सकाळी २ ते ३ वाजताच्या सुमारास हा थरकाप उडवणारा प्रकार घडल्याचं सांगितलं जातं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांनी संपूर्ण गाव सील केले आहे. छिंदवाडाचे पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पोलिसांच्या रिपोर्टनुसार, आरोपी हा मानसिकदृष्ट्या अस्थिर होता. याशिवाय तो कोणत्या नशेच्या अमलाखाली होता का? हे तपासलं जात आहे. रिपोर्टनुसार, त्याच्यामध्ये आणि त्याच्या पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. त्यानंतर त्याने संपूर्ण कुटुंबालाच संपवलं आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन कुऱ्हाड जप्त केली आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नुकतेच लग्न झाले होते.

MP crime
Nashik Fraud Crime News: फर्टिलायझर कंपनीची लाखोंची फसवणूक; खत विक्रत्याला इंदिरानगर पोलिसांकडून अटक

कुटुंबातील एक मुलगी फक्त वाचली आहे. तिने या घटनेची आपबीती सांगितली. सदर घटनेमुळे संपूर्ण गावाला धक्का बसला आहे. कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह घरामध्ये अस्थव्यस्थ पडले होते. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले असून अधिक तपास सुरु आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com