Car flips multiple times as driver tries to spit gutkhaEsakal
देश
Accident News : १००च्या स्पीडनं कार चालवताना गुटखा थुंकण्यासाठी दरवाजा उघडला; गाडी ४-५ वेळा उलटली, एकाचा मृत्यू
Chhattisgarh Innova Accident : इनोव्हा चालक १०० च्या स्पीडने गाडी चालवत होता आणि अचानक त्यानं गुटखा थुंकण्यासाठी दरावा उघडला. यामुळे गाडी उलटली आणि भीषण अपघात झाला.
चालकाच्या बेजबाबदारपणामुळे झालेल्या भीषण अपघातात एका व्यापाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. छत्तीसगढच्या विलासपूर इथं हा अपघात झाला. इनोव्हा चालक १०० च्या स्पीडने गाडी चालवत होता आणि अचानक त्यानं गुटखा थुंकण्यासाठी दरावा उघडला. यामुळे गाडी उलटली आणि भीषण अपघात झाला.