संतापजनक! बलात्कार करून महिलेची हत्या, मृतदेहावरही वारंवार बलात्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hyderabad Rape Case

संतापजनक! बलात्कार करून महिलेची हत्या, मृतदेहावरही वारंवार बलात्कार

हैदराबाद : एका २५ वर्षीय तरुणाने एका २४ वर्षीय तरुणीवर बलात्कार (Crime Against Woman) केला. त्यानंतर तिची हत्या केली. इतकेच नाहीतर तिच्या मृतदेहावर देखील बलात्कार केला. तेलंगणातील हैदराबादपासून (Hyderabad) ५० किमी अंतरावर असलेल्या चौतुप्पल गावात घडली आहे.

हेही वाचा: तो‘ वैवाहिक बलात्कार मानावा का, याबाबत न्यायमूर्तींतच मतभिन्नता

आरोपी बांधकाम पर्यवेक्षक म्हणून काम करत होता. त्याच्या घराजवळील गोडाऊनमध्ये पीडित महिला आपल्या पतीसोबत राहत होती. तिचा पती जवळच्या महाविद्यालयात वॉचमन म्हणून काम करत होता. त्यामुळे ती महिला दिवसभर घरी एकटीच राहत होती. आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या मागावर होता. गेल्या ९ मे रोजी आरोपीने गोदामात घुसून महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला. त्यानंतर तासाभरातच तिच्या डोक्यावर वार करून तिची हत्या केली. इतकेच नाहीतर नराधमाने वारंवार तिच्या मृतदेहावर बलात्कार केला.

हा भीषण गुन्हा केल्यानंतर त्याने तिचे सोन्याचे दागिने चोरून तेथून पळ काढला. पीडितेच्या पतीने दिलेल्या पोलिस तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी बलात्कार, खून आणि भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) इतर संबंधित कलमांचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी परिसरातील लोकांशी बोलून आरोपीला ओळखले आणि त्याला बुधवारी, 11 मे रोजी गुन्ह्याच्या ठिकाणापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या मलकापूर गावातून अटक केली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरीचे दागिने जप्त केले आणि त्याला न्यायालयात हजर केले, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली, असे चौतुप्पल सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी), उदय रेड्डी यांनी सांगितले.

Web Title: Man Raped Woman After Death In Hyderbad Of Telangana

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :TelanganacrimeHyderabad
go to top