बेळगाव : चॉकलेटचे आमीष दाखवून बालिकेवर अत्याचार (Child Abuse) करणाऱ्या आरोपीला २० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. तृतीय जिल्हा आणि विशेष पोक्सो न्यायालयाने (POCSO Court) काल (ता. ३) हा निकाल दिला. फेब्रुवारी २०२४ मध्ये नंदगड पोलिस ठाण्याच्या अखत्यारित अत्याचाराची घटना घडली होती. या प्रकरणी आरोपीला २० वर्षे शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंडही न्यायालयाने ठोठाविला आहे.