
जीवलग मित्राची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या अंत्ययात्रेत डिजे लावून त्यासमोर नाचत मित्राने निरोप दिला. मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातला हा अंत्ययात्रेतला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जवासिया गावातील ही घटना असून अंबालाल प्रजापती असं मित्राच्या अंत्ययात्रेत डीजेसमोर नाचणाऱ्याचं नाव आहे.