
कोरोना महामारीच्या काळात वर्क फ्रॉम होम (work from home हा नवा ट्रेंड सुरु झाला आहे. कोरोना काळात घराबाहेर पडता येत नसल्यामुळे अनेक जण घरातूनच ऑफिस, बिझनेस वा अन्य काम करत आहेत. विशेष म्हणजे अनेक जण आपल्या गावी, पिकनिक स्पॉट यांसारख्या ठिकाणी जाऊनदेखील व्यवस्थितरित्या ऑफिसचं काम करु शकत आहेत. त्यामुळे वर्क फ्रॉम होम हा ट्रेंड कर्मचारी वर्गात लोकप्रिय होऊ लागला आहे. मात्र, वर्क फ्रॉम होमच्या या ट्रेंडमध्ये सध्या वर्क फ्रॉम हॉस्पिटल (WFH) करणाऱ्या एका व्यक्तीची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर एका व्यक्तीने त्याचा हॉस्पिटलमध्ये बसून काम करतानाचा फोटो शेअर केला आहे. (man-worked-from-hospital-while-wife-gave-birth-viral-linkedin-post)
सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. वर्क फ्रॉम होमच्या जमान्यात हा व्यक्ती वर्क फ्रॉम हॉस्पिटल (WFH) करत आहे. विशेष म्हणजे तो असं करण्यामागचं कारणदेखील तितकंच खास आहे. नुकतंच या व्यक्तीच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे तो सध्या हॉस्पिटलमध्ये बसून ऑफिसचं काम करत आहे. हा फोटो @SamHodges या ट्विटर युजरने व्हायरल केला आहे.
हॉस्पिटलमधून ऑफिसचं काम करणाऱ्या या व्यक्तीने त्याचा हा फोटो LinkedIn वर शेअर केला होता. सोबतच त्याने एक मोठी पोस्टही शेअर केली होती. "माझ्या पत्नीने एप्रिलमध्ये आमच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. मला खरंच यावेळी वर्क फ्रॉम हॉस्पिटल करावं लागलं. त्या काळात माझं वर्क फ्रॉम होमचं स्वरुप वर्क फ्रॉम हॉस्पिटलमध्ये बदलून गेलं होतं. पण याविषयी माझी कोणतीच तक्रार नाही. कोरोना काळात घडून आलेल्या या बदलाकडे मू सकारात्मक दृष्टीनेच पाहतोय. थोडक्यात, मी काम करत असताना सुद्धा माझं बाळ माझ्या जवळ होतं. वडील झाल्यानंतर आपल्या बाळापासून दूर राहणं किती कठीण असं हे शब्दांत व्यक्त करता येणार नाही", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं.
पुढे ते म्हणतात, "दररोज ऑफिसमध्ये जाऊन काम केल्यामुळे अनेक गोष्टींचा एकत्र मेळ साधणं कठीण होतं. ऑफिसमध्ये असतो तर मला काही दिवसांसाठी सुट्टी घ्यावी लागली असते. त्यामुळे कामाच्या कंटिन्युटीवरही परिणाम झाला असता. परंतु, सध्याच्या वर्किंग कंडिशनमुळे मी माझ्या कुटुंबाला आणि क्लाइंट्स या दोघांनाही वेळ देऊ शकलो."
दरम्यान, सध्या वर्क फ्रॉम हॉस्पिटलचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. २० हजारांपेक्षा जास्त लाईक्स या फोटोला मिळाले असून अनेकांनी तो रिट्विट केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.