लहान मुलांना काजळ लावणं ठरु शकतं घातक; होऊ शकतात दुष्परिणाम

बाळाला काजळ लावणं वेळीच थांबवा; डोळ्यांना होऊ शकते इजा
लहान मुलांना काजळ लावणं ठरु शकतं घातक; होऊ शकतात दुष्परिणाम
Updated on

आपल्या बाळाला (newborn) कोणाची दृष्ट लागू नये किंवा ते छान दिसावं यासाठी प्रत्येक भारतीय स्त्री आपल्या बाळाला काजळ (Kajal) लावत असते. अनेक स्त्रिया कपाळ, गाल, हनुवटीसोबतच मुलांच्या नाजूक डोळ्यांमध्येही (eye) भरभरून काजळ लावतात. परंतु, मुलांच्या डोळ्यांना काजळ लावणं त्यांच्यासाठी घातक ठरु शकतं. विशेष म्हणजे डॉक्टरांनी सल्ला दिल्यानंतरही अनेक स्त्रिया त्याकडे दुर्लक्ष करुन मुलांच्या डोळ्यात काजळ लावतात. त्यामुळेच काजळ लावल्यामुळे मुलांच्या डोळ्यांना कशी इजा होऊ शकते. किंवा, मुलांना नेमका कसा त्रास होऊ शकतो हे जाणून घेऊयात. (parenting-tips-do-you-know-is-it-safe-or-not-to-apply-kajal-to-newborn-eyes)

१. काजळाचा वापर विषारी ठरू शकतो -

अलिकडेच लहान मुलांविषयी एक संशोधन करण्यात आलं. त्यानुसार, लहान मुलांच्या शरीरात हाइअर गट ऑप्‍जर्पशन असतं. तसंच त्यांच्या नर्व्हस सिस्टीमदेखील व्यवस्थितपणे विकसित झालेल्या नसतात. अशावेळी जर तुम्ही मुलांना काजळ लावत असाल. तर, या काजळामध्ये असलेलं लीड विषाप्रमाणे काम करु शकतं. त्यामुळे मुलांच्या डोळ्यांना इजादेखील होऊ शकते.

लहान मुलांना काजळ लावणं ठरु शकतं घातक; होऊ शकतात दुष्परिणाम
धक्कादायक! स्टेजवरुन उतरली नाही म्हणून बारबालेवर झाडली गोळी

२. निर्माण होऊ शकतो हा त्रास -

काजळ तयार करताना अनेक रासायनिक प्रक्रिया केल्या जातात. त्यामुळे या काजळात लीड मोठ्या प्रमाणावर असतं. हे लीडचं लहान मुलांसाठी घातक आहे. लीडच्या अतिवापरामुळे मुलांच्या किडनी, मेंदू, मज्जातंतू यांसह अन्य शारीरिक भागांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. जर आपल्या रक्तामध्ये लीडचं प्रमाण वाढलं तर व्यक्ती कोमात जाऊ शकतो. एका वयस्क व्यक्तींना लीडचा असा त्रास होऊ शकतो. तर विचार करा लहान मुलांना त्याचा किती त्रास होईल.

३. काजळ सुरक्षित नाहीच -

मुलांच्या डोळ्यांना इजा होऊ नये यासाठी अनेक स्त्रिया घरीच काजळ तयार करतात.परंतु, घरी तयार केलेलं काजळदेखील मुलांसाठी सुरक्षित नाही. या काजळात असलेला कार्बन मुलांसाठी त्रासदायक ठरु शकतो. तसंच आपण मुलांना आपल्या हाताच्या सहाय्याने काजळ लावत असतो. परंतु, आपल्या बोटांच्या मार्फत मुलांच्या डोळ्यांमध्ये इंफेक्शनदेखील होण्याची शक्यता असते.

लहान मुलांना काजळ लावणं ठरु शकतं घातक; होऊ शकतात दुष्परिणाम
पत्नी तुमचा आदर करत नाही?; 'ही' असू शकतात त्यामागची कारणं

समज- गैरसमज -

१. लहान मुलांना रोज काजळ लावलं तर त्यांचे दृष्टीदोष दूर होतील किंवा डोळे मोठे होतील असा समज आहे. मात्र, यात काहीही तथ्य नाही.

२. काजळ लावल्यामुळे मुलांना शांत झोप येते? अजिबात नाही. काजळ न लावतादेखील मुलं दररोज १८ ते १९ तास शांत झोपतात.

३. काजळ लावल्यामुळे नजर लागत नाही? यात काहीच तथ्य नाही. किंवा, त्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com