Mandsaur College Scandal
esakal
मंदसौर : मध्य प्रदेशातील सरकारी महाविद्यालयात युवक महोत्सवाच्या दरम्यान मुलींचे कपडे बदलत असताना त्यांचे व्हिडिओ शूट केल्याच्या गंभीर प्रकरणात (Mandsaur College Scandal, ABVP Leader Arrested) तीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हे २० ते २२ वर्षे वयोगटातील असून त्यांपैकी एक जण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad ABVP) चा पदाधिकारी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.