
आंब्यांनी भरलेला ट्रक उलटून आंध्र प्रदेशात भीषण दुर्घटना घडलीय. यात ९ जणांचा मृत्यू झाला असून १० जण गंभीर जखमी झाले आहेत. अन्नमय्या जिल्ह्यात रविवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. जखमींना राजमपेटमधील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पुल्लमपेट्टातील रेड्डी चेरुवु कट्टा इथं हा अपघात झाला. आंब्याने भरलेल्या ट्रकमध्ये बसलेले मजूर ट्रक उलटताच त्याखाली चिरडले गेले.