
माणिक साहा होणार त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री
नवी दिल्ली : त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब (Biplab Kumar Deb) यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्रिपुरा भाजपचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार माणिक साहा (Manik Saha) यांची राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. केंद्रीय मंत्री आणि निरीक्षक भूपेंद्र यादव यांनी साहाच्या नावाची घोषणा केली आहे. दरम्यान,त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर, बिप्लब कुमार देब यांनी त्यांना जबाबदारी दिल्याबद्दल केंद्रीय नेतृत्वाचे आभार मानले आहेत. (Manik Saha Appointed As New Chief Minister Of Tripura)
त्रिपुरा भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल माणिक साहा यांचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी अभिनंदन केले आहे. तसेच मला विश्वास आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली त्रिपुरा विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
२०१८ मध्ये झालेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत बिप्लब देब हे राज्यातील भाजपचा सर्वांत मोठा चेहरा होते. त्यांनी राज्यातील २५ वर्ष जुन्या डाव्या सरकारचा पराभव करून भाजपला राज्यात सत्तेवर आणले होते. बिप्लब कुमार देव (Biplab Deb) यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना राजीनामा सुपूर्द केला आहे.
हेही वाचा: केतकीला चांगल्या उपचारांची गरज; अजित पवारांचा सल्ला
अलीकडेच बिप्लब कुमार देव यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. पक्ष नेतृत्वाच्या सांगण्यावरून बिप्लब कुमार देव यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे समजते. आज सायंकाळी त्रिपुरामध्ये भाजप (BJP) आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर निर्णय घेतला जाणार आहे. बैठकीला भाजप नेतृत्वाच्या वतीने केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
Web Title: Manik Saha Likely To Be The New Chief Minister Of Tripura
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..