केतकीला चांगल्या उपचारांची गरज; अजित पवारांचा सल्ला | Ajit Pawar reaction on Ketaki Chitale facebook post | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केतकीला चांगल्या उपचारांची गरज; अजित पवारांचा सल्ला
केतकीला चांगल्या उपचारांची गरज; अजित पवारांचा सल्ला

केतकीला चांगल्या उपचारांची गरज; अजित पवारांचा सल्ला

टीव्ही अभिनेत्री केतकी चितळेने (Ketaki Chitale) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षापार्ह शब्दात टीका केल्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिच्या पोस्टवर तीव्र निषेध व्यक्त केला. आणि तिला चांगल्या दवाखन्यात नेऊन तिच्यावर उपचार करण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा: केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात; पवारांवरील पोस्ट भोवली

केतकी चितळे हीने फेसबूकवर केलेल्या पोस्टनंतर तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. या घटनेवर भाष्य करताना ते म्हणाले, ''बोलण्याआधी प्रत्येकाने भान ठेवावे. खालच्या पातळीवर जाण्याची महाराष्ट्राला कधीही गरज नव्हती. आपला महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. पवारांबाबत जे काही लिहल बोललं ती विकृती आहे. त्यामुळे चांगल्या दवाखन्यात नेऊन केतकीवर उपचार करायला हवेत.'' असा सल्ला अजित पवारांनी यावेळी दिला.

हेही वाचा: केतकी चितळे प्रकरणावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...

केतकी चितळेची काय होती पोस्ट?

केतकीने केलेल्या पोस्टमध्ये "ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतोय नरक" असे शब्द वापरण्यात आले आहेत, या आक्षेपार्ह पोस्टनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका स्विकारली आहे. यानंतर या पोस्टवर अनेक स्तरातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून, केतकी चितळेने ही पोस्ट करुन भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेशाची भावना, तेढ, वैमनस्य निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.

या आक्षेपार्ह पोस्ट नंतर तिला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Web Title: Ajit Pawar Reaction On Ketaki Chitale Facebook Post

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :EntertainmentAjit Pawar
go to top