मणिपूरमधील 12 मतदान केंद्रांवर 5 मार्चला पुन्हा मतदान : निवडणूक आयोग

Election Commission
Election Commissionesakal
Summary

मणिपूरमध्ये विधानसभेच्या एकूण 60 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होत आहे.

इम्फाल : निवडणूक आयोगानं (Election Commission) मणिपूरमधील पाच विधानसभा मतदारसंघातील (Manipur Assembly constituency) 12 मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिलेत. या जागांसाठी 28 फेब्रुवारी रोजी मतदान झालं होतं. मणिपूरचे मुख्य निवडणूक अधिकारी राजेश अग्रवाल (Election Officer Rajesh Agarwal) यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हंटलंय की, या केंद्रांवर 5 मार्च रोजी पुन्हा मतदान होईल. खुंद्रकपम, सैतू, थानलॉन, हेंगलप आणि चुराचंदपूर विधानसभा मतदारसंघातील केंद्रांवर पुन्हा मतदान होणार असून या केंद्रांवर फेरमतदानाची शिफारस करण्यात आली होती, असं निवेदनात नमूद केलंय.

या मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशिनचं (EVM Machine) नुकसान करण्यात आलं होतं, त्यामुळं आयोगानं हा निर्णय घेतलाय. सरौथेल, न्यू कीथेलमानबी, सोंगसांग, माईते, तिनसेओंग, माझुरोन कुकी, चिंगफेई, खोइरेंटक, मोलसांग, लेइनोम, तिकोट आणि मौकोट या मतदान केंद्रांत पुन्हा मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 38 विधानसभा जागांसाठी 28 फेब्रुवारीला मतदान झालं होतं, तर दुसऱ्या टप्प्यात 22 जागांसाठी 5 मार्चला मतदान होणार आहे.

Election Commission
70 वर्षात काँग्रेसनं फक्त 74 विमानतळं बांधली : ज्योतिरादित्य सिंधिया

मणिपूरमध्ये विधानसभेच्या एकूण 60 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार होतं. मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 27 फेब्रुवारी रोजी घोषित करण्यात आलं आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान 3 मार्च 2022 रोजी घोषित करण्यात आलं. मणिपूरमध्ये 10 मार्चला मतमोजणी होणार आहे. सध्या मणिपूरमध्ये भाजपचं सरकार (BJP Government) असून विद्यमान सरकारचा कार्यकाळ 19 मार्च 2022 रोजी संपत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com