
मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सादर केला आहे. गेल्या वर्षीच, बिरेन सिंग यांनी मणिपूर हिंसाचाराबद्दल मणिपूरच्या लोकांची माफी मागितली होती. आज त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर हा निर्णय घेतला आहे. तर आता राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी होत आहे.