
इम्फाळः मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या जवानांवर शुक्रवारी सायंकाळी अज्ञात हल्लेखोरांनी सापळा रचून केलेल्या हल्ल्यामध्ये दोन जवान हुतात्मा झाले तर अन्य चारजण हे जखमी झाले आहेत. इम्फाळच्या बाहेरील भागामध्ये ही घटना घडली. हे जवान एका मोटारीतून इम्फाळहून विष्णूपूरच्या दिशेने चालले असताना नाम्बोल सबल लेईकाइ परिसरामध्ये हा हल्ला करण्यात आला. ज्या ठिकाणी हा हल्ला झाला ते स्थळ इम्फाळ विमानतळापासून आठ किलोमीटर अंतरावर आणि इम्फाळ-चुराचांदपूरदरम्यान आहे.