
Manipur Politics
sakal
नवी दिल्ली : मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणत त्याठिकाणी सरकार स्थापन केले जावे, अशी मागणी घेऊन दिल्लीत आलेल्या या राज्याच्या २६ आमदारांना आठवडा उलटला तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची वेळ मिळालेली नाही. ‘बिहारची विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर या,’ असा संदेश वरिष्ठ नेत्यांमार्फत या आमदारांना पाठवण्यात आल्याचे समजते.