Manipur Violence: मणिपूर भारताचा भाग आहे का? असेल तर पंतप्रधान शांत का? विरोधकांनी विचारला सवाल

मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना थांबवण्याचं नाव घेत नाहीएत. आजही पुन्हा एकदा इथं एका भागात हिंसा भडकली आहे.
what is really behind the violence in manipur civilians rescued death toll indian army surveillance assam rifle
what is really behind the violence in manipur civilians rescued death toll indian army surveillance assam riflesakal

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये जातीय दंगलीनं रौद्र रुप धारणं केलं असून अद्याप इथला हिंसाचार थांबवण्याच नाव घेत नाहीए. आज पुन्हा एकदा इथल्या एका भागात हिंसा भडकल्याचं वृत्त आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसनं पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. मणिपूर भारताचा भाग आहे का? असा सवाल करत जर असेल तर PM मोदी शांत का आहेत? असा सवाल विरोधकांनी केला आहे. (Manipur Violence is Manipur a part of India If yes why is PM silent Question asked by opponents)

what is really behind the violence in manipur civilians rescued death toll indian army surveillance assam rifle
Post Godhra Riots: "पोलिसांनी हिंदूंना गोवलं"; गुजरात कोर्टानं केली 35 आरोपींचा मुक्तता

मणिपूरमधील दोन आदिवासी जमातींमध्ये वाद असून या वादातून ३ मे पासून जातीय तणावातून हिंसाचाराच्या घटना घडायला सुरुवात झाली ती आजपर्यंत सुरुच आहे. यापार्श्वभूमीवर तीन वेळा मणिपूरचे मुख्यमंत्री राहिलेले ओकराम आबोबी सिंह यांनी १० विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळासह मणिपूरहून दिल्लीला पोहोचले आहेत. या शिष्टमंडळाची १२ जून रोजी पंतप्रधानांची भेट होणार होती, पण त्यांना अद्याप पंतप्रधान मोदींची अपॉईंटमेंट मिळू शकलेली नाही. (Latest Marathi News)

what is really behind the violence in manipur civilians rescued death toll indian army surveillance assam rifle
Eknath Shinde: रिक्षाचालकाचा CM शिंदेंच्या घराबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न! काय घडलंय वाचा

या शिष्टमंडळामध्ये काँग्रेस, जेडीयू, सीपीआय, सीपीएम, आरएसपी, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, त्रृणमूल काँग्रेस, ठाकरे शिवसेना, आम आदमी पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. या सर्व पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात पार पडली. यावेळी वरिष्ठ नेते म्हणाले, ३ मे पासून आजपर्यंत मणिपूर जळतंय. प्रत्येक दिवशी इथं हिंसाचाराची घटना घडत आहे. काल संध्याकाळी केंद्रीय मंत्री आर. आर. रंजन यांच्या घरावर हल्ला केला. (Marathi Tajya Batmya)

what is really behind the violence in manipur civilians rescued death toll indian army surveillance assam rifle
Kedarnath Controversay: खबळजनक! केदारनाथ मंदिरातील अब्जावधींचं सोन बनलं पितळ; पुरोहितांचा आंदोलनाचा इशारा

"राज्यात सर्वत्र तणावाचं वातावरण असून मदत कॅम्पमध्ये रडण्याचे आवाज ऐकू येतात. या कॅम्पसमध्ये सुमारे २०,००० लोक राहत आहेत. यामध्ये महिला बालकांचाही समावेश आहे. पण अत्तापर्यंत पंतप्रधान मोदी मणिपूरवर काहीही बोललेले नाहीत.

आता आम्हाला वाटायला लागलंय की, मणिपूर हा भारताचा भाग आहे की नाही? जर असेल तर पंतप्रधानांनी यावर काहीतरी बोलायला हवं. कमीत कमी त्यांनी ट्विटच्या माध्यमातून तरी बोलायला हवं" असं या शिष्टमंडळातील वरिष्ठ नेत्यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com