crime news
sakal
मणिपूरमध्ये अडीच वर्षांपूर्वी मे २०२३ मध्ये झालेल्या जातीय हिंसाचाराचा सामूहिक बलात्कार झालेल्या कुकी समुदायातील पीडितेचा मृत्यू झाला आहे. कुटुंबियांनी सांगितलं की, त्या भयंकर घटनेतून ती कधी सावरलीच नाही. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या ती खचली होती. मनावर झालेला आघात आणि शरिरावर झालेल्या जखमांनी तिची प्रकृती बिघडत गेली. अडीच वर्षे तिने त्रास सहन केला. उपचारानंतरही तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही.