नवी दिल्ली - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी दिल्लीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १७ अ अंतर्गत वर्गखोल्या आणि शाळा बांधकामातील अनियमिततेच्या संदर्भात मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध औपचारिक चौकशी सुरू करण्यास मंजुरी दिली. या निर्णयामुळे सिसोदिया आणि जैन यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
या कामात अनियमितता आढळून आली तेव्हा सिसोदिया हे शिक्षणमंत्री तर जैन हे दिल्लीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. केंद्र सरकारने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यात जुलै २०१८ मध्ये कलम १७ ए एक दुरुस्ती करून समाविष्ट केले होते.
या कलमामुळे पोलिस, सीबीआय किंवा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांशी संबंधित इतर कोणत्याही संस्थेने भ्रष्टाचाराशी संबंधित गुन्ह्यांची कोणतीही चौकशी वा तपास करण्यासाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक केले होते.
केंद्रीय दक्षता आयोगाने १७ फेब्रुवारी २०२० रोजीच्या एका अहवालात सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे दिल्लीत शाळांमधील २ हजार ४०० पेक्षा अधिक वर्गखोल्यांच्या बांधकामात ठळकपणे अनियमितता आढळून आल्याचे म्हटले होते.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार सन २०२२ मध्ये दिल्ली सरकारच्या दक्षता संचालनालयाने यातील कथित घोटाळ्याच्या चौकशीची शिफारस करून मुख्य सचिवांना अहवाल सादर केला होता.
२६ ऑगस्ट २०२२ रोजी दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी मुख्य सचिव नरेश कुमार यांच्याकडून कथित अनियमितता आणि अतिरिक्त वर्गखोल्यांच्या बांधकामात झालेल्या खर्चाच्या चौकशी अहवालावर कारवाई करण्यासाठी झालेल्या विलंबाबाबत अहवाल मागवला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.