मनमोहन सिंग, शरद पवार यांची इच्छा असून जमलं नाही; मोदींनी करून दाखवलं- कृषीमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 28 December 2020

नव्या कृषी कायद्यावरुन शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये कोणताही तोडगा निघू शकलेला नाही.

नवी दिल्ली- नव्या कृषी कायद्यावरुन शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. विरोधकांनी कृषी कायद्यावरुन भाजपला लक्ष्य केले आहे, तर भाजपने विरोधकांवर राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषी कायद्यांचे वारंवार समर्थन केले असून विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. 

महिन्याभरातच बिहार आघाडी सरकारमध्ये धुसफूस; 'लव्ह जिहाद' ठरतोय वादाचा...

एका कार्यक्रमात बोलताना तोमर यांनी विरोधकांवर निशाणा साधला. यूपीए सरकारच्या काळात, मनमोहन सिंग आणि शरद पवार यांना कृषी कायदे आणायचे होते, पण ते प्रभाव आणि दबाव सहन करु शकले नाहीत. आपण सर्व खूप भाग्यवान आहोत की नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान आहेत. ते निस्वार्थपणे देशाच्या विकासासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी दिवसरात्र काम करत आहेत, असं कृषीमंत्री म्हणाले. 

मला विश्वास आहे की लोकांचा पाठिंबा, सकारात्मक दृष्टीकोण आणि कायद्यांची संपूर्ण माहिती झाल्यानंतर हे कायदे लागू होतील आणि आम्ही शेतकऱ्यांना हे समजून सांगण्यास यशस्वी होऊ. नवीन मार्ग तयार होईल आणि भारताचे कृषीक्षेत्र प्रगती करेल, असं ते म्हणाले.  कृषीमंत्री तोमर शेतकरी प्रतिनिधींची चर्चा करत आहेत. त्यांना कायद्याच्या फायद्यांबाबत माहिती देत आहेत, पण शेतकऱ्यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, 30 डिसेंबर रोजी शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. दिल्लीच्या सीमेवर एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी कृषी कायदे रद्द करण्याची टोकाची भूमिका घेतली आहे, दुसरीकडे सरकारने कायद्यात आवश्यकतेनुसार सुधारणा करण्याची तयारी दाखवली आहे, पण कायदे रद्द करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पुढील बैठकीत काही तोडगा निघतो का, हे पाहावं लागेल. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manmohan Singh Sharad Pawar wanted to bring Farm Laws but they could not  Narendra S Tomar