Manmohan Singh Birthday : दीर्घायुषी व्हा! PM मोदी, शरद पवारांकडून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना शुभेच्छा

Manmohan Singh Birthday pm modi sharad pawar wish long and healthy life to dr manmohan singh marathi news
Manmohan Singh Birthday pm modi sharad pawar wish long and healthy life to dr manmohan singh marathi news

देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांचा आज ९१वा वाढदिवस आहे. यादरम्यान माजी पंतप्रधानांना देशाभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांना वाढदिवसानिमीत्त शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी तुमच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतो अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दखील मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक यशाची नवीन उंची गाठली आणि उच्च विकास दर गाठला. ईश्वर त्यांना दीर्घायुष्य व निरोगी आयुष्य देवो, अशी पोस्ट शरद पवारांनी 'एक्स'वर केली आहे.

माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी ब्रिटिश भारतातील पंजाब प्रांतातील चकवाल जिल्ह्यात झाला. हा जिल्हा आता पाकिस्तानात आहे. पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी 1982 ते 1985 या काळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर म्हणून काम केले. माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये देखील ते अर्थमंत्रीही होते. 1991 मध्ये भारतात आर्थिक उदारीकरण आणण्यात त्यांची मोठी भूमिका होती.

Manmohan Singh Birthday pm modi sharad pawar wish long and healthy life to dr manmohan singh marathi news
Meesho Jobs : सणासुदीच्या काळात 'मीशो'कडून नोकरीची मोठी संधी! येत्या काळात देणार पाच लाख नोकऱ्या

मनमोहन सिंग यांनी 2004 ते 2014 पर्यंत दोन वेळा देशाचे पंतप्रधान म्हणून काम केले आहे.देशातील महत्वाच्या राजकारण्यापैकी एक मनमोहन सिंग यांची एक उत्कृष्ट अर्थतज्ज्ञ म्हणूनही त्यांची ओळख आहे. मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठातून शिक्षण घेतले आणि त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ब्रिटनला गेले. त्यांनी ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्रात प्रथम श्रेणीसह पदवी मिळवली.

माजी पंतप्रधानांनी 1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डी.फिल पूर्ण केले. त्यांनी पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक म्हणूनही काम केले. UNCTAG सचिवालयात काही काळ काम केल्यानंतर, त्यांनी 1987 ते 1990 दरम्यान जिनिव्हा येथे दक्षिण आफ्रिकन आयोगाचे महासचिव म्हणून काम केले.

Manmohan Singh Birthday pm modi sharad pawar wish long and healthy life to dr manmohan singh marathi news
Aadhaar Biometric : 'आधार' जगातील सर्वात विश्वासार्ह डिजिटल आयडी; सरकारने फेटाळला 'मूडीज'चा दावा

अनेक प्रमुख पदे भूषवली

मनमोहन सिंग यांनी 1970 आणि 1980 च्या दशकात भारत सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. त्यांनी मुख्य आर्थिक सल्लागार (1972-76), रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर (1982-85) आणि नियोजन आयोगाचे अध्यक्ष (1985-87) म्हणून काम केले. मनमोहन सिंग 1991 आणि 1996 मध्ये देशाचे अर्थमंत्रीही होते. ते सध्या राजस्थानमधून राज्यसभा सदस्य आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com