Mann Ki Baat 100 Episode 2023
Mann Ki Baat 100 Episode 2023esakal

Mann Ki Baat 100 Episode : बेटी बचाओ ते बराक ओबामांपर्यंत..; जाणून घ्या पंतप्रधानांच्या मनातील 10 मोठ्या गोष्टी

'मन की बात'च्या 100 व्या एपिसोडमध्ये पीएम मोदींनी (PM Modi) आतापर्यंतच्या प्रवासाचा अनुभव शेअर केला.
Summary

मला तुमची पत्रं, लाखो मेसेज मिळाले. मी शक्य तितकं वाचण्याचा प्रयत्न केला. तुमची पत्रं वाचून मी कितीतरी वेळा भावूक झालो.

Mann Ki Baat 100 Episode : 'मन की बात'च्या 100 व्या एपिसोडमध्ये पीएम मोदींनी (PM Modi) आतापर्यंतच्या प्रवासाचा अनुभव शेअर केला. पीएम मोदींनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंतच्या कामगिरीचा उल्लेख केला.

तुम्ही सर्व अभिनंदनास पात्र आहात

मला तुमची पत्रं, लाखो मेसेज मिळाले. मी शक्य तितकं वाचण्याचा प्रयत्न केला. तुमची पत्रं वाचून मी कितीतरी वेळा भावूक झालो. भावनेच्या भरात वाहून गेलो. मी मनापासून सांगतो, की मन की बातच्या 100 व्या भागासाठी तुम्ही सर्व अभिनंदनास पात्र आहात, असंही मोदी म्हणाले.

Mann Ki Baat 100 Episode 2023
Karnataka : काँग्रेसनं 91 वेळा मला शिव्या दिल्या, त्यांनी आंबेडकर-सावरकरांनाही सोडलं नाही; मोदींचा हल्लाबोल

वाईटावर चांगल्याचा विजय

3 ऑक्टोबर 2014 रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर मन की बातचा प्रवास सुरू झाला. विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय. मन की बात हाही देशवासियांसाठी सकारात्मकतेचा अनोखा सण बनला. दर महिन्याला येणारा सण. याची आपण सर्वजण वाट पाहत असतो.

बराक ओबामांचा उल्लेख

अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी मी 'मन की बात'च्या माध्यमातून चर्चा केली, तेव्हा जगभर याची चर्चा झाली. मन की बात ही माझ्यासाठी इतरांच्या गुणांची पूजा करण्यासारखी आहे. इतरांच्या गुणांची पूजा करावी, असे माझे मार्गदर्शक म्हणायचे. मित्र असो वा विरोधक, त्यांच्या चांगल्या गुणांकडून शिकलं पाहिजे.

Mann Ki Baat 100 Episode 2023
Karnataka : ..तर काँग्रेस घालणार महिला आमदाराच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ? बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

जनभावना हा माझा अविभाज्य भाग

पन्नास वर्षांपूर्वी मी माझं घर सोडलं नाही. कारण, मला माझ्याच लोकांपासून तोडलं गेलं होतं. मन की बातनं मला या आव्हानावर तोडगा दिला. सामान्य माणसांशी जोडण्याची संधी दिली. कार्यालय आणि प्रोटोकॉल व्यवस्थेपुरतं मर्यादित राहिलं. जनभावना हा माझा अविभाज्य भाग बनला.

मन की बात हा कार्यक्रम नसून श्रद्धा आहे

दर महिन्याला मी देशातील जनतेचे हजारो संदेश वाचतो, त्यांचा अद्भुत स्वभाव अनुभवतो. मला असंही वाटत नाही की, मी तुमच्यापासून खूप दूर आहे. माझ्यासाठी मन की बात हा कार्यक्रम नसून श्रद्धा, उपासना, व्रत आहे.

सुनीलजींची सेल्फी विथ डॉटर मोहीम

हरियाणाच्या सुनील जागलानबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले, त्यांनी हरियाणात लिंग गुणोत्तरावर काम केलं. मी बेटी बचाओ बेटी पढाओ मोहीम सुरू केली. तर, सुनीलजींनी सेल्फी विथ डॉटर मोहीम सुरू केली. ती जगभर लोकप्रिय झाली. मुद्दा सेल्फीचा नाही, तर मुलीला प्राधान्य देण्यात आलं. अशा अनेक प्रयत्नांचे फलित म्हणजे आज हरियाणात लिंग गुणोत्तर सुधारलं आहे.

Mann Ki Baat 100 Episode 2023
मोठी बातमी! निवडणूक प्रचारसभेला जात असताना माजी मुख्यमंत्री कारमधून खाली कोसळले

पेन्सिल स्लेटबाबत मंजूर अहमद यांच्याशी चर्चा

मंजूर अहमद यांच्याशी फोनवर बोलताना पीएम मोदी म्हणाले, तुमच्याशी बोलून मला खूप बरं वाटलं. पेन्सिल स्लेटबाबत पीएम मोदींनी विचारलं की, हे काम कसं चाललं आहे. अहमद म्हणाले, आता माझ्यासोबत 200 लोक काम करत आहेत. येत्या काही दिवसांत आणखी 200 लोक सामील होतील. पंतप्रधान म्हणाले की, तुम्ही म्हणाला होता की हे असं काम आहे ज्याची ओळख नाही आणि कोणाला माहिती नाही. पण, आता 200 लोक सामील झाले आहेत, आणखी 200 लोक सामील होतील. हे खूप छान आहे. आता त्याची ओळख वाढत असल्याचं मंजूर म्हणाले. त्यामुळं अधिक लोकांना रोजगार मिळत आहे.

विजयशांतीशी मोदींचा संवाद

विजयशांतीशी बोलताना पीएम मोदींनी विचारलं, तुमचं काम कसं चाललं आहे. विजयशांतीनं सांगितलं, आता आम्ही 30 महिलांसोबत काम करत आहोत. येत्या काही दिवसांत 100 लोक सामील होतील. 'मन की बात' मुळं सर्वजण कमल रेशमला ओळखत आहेत. आता माझ्याकडं अमेरिकेतूनही ग्राहक आहेत. या वर्षापासून आम्ही आमची उत्पादनं अमेरिकेत निर्यात करू, असं विजयशांतींनी सांगितलं.

Mann Ki Baat 100 Episode 2023
Narendra Patil : उद्धव ठाकरेंना हिंदुत्वापासून तोडण्यास शरद पवारच जबाबदार; भाजप नेत्याचा गंभीर आरोप

G20 मध्ये भारत आघाडीवर

युनेस्कोचे डीजी म्हणाले, नमस्ते.. मन की बात कार्यक्रमाच्या 100 व्या भागाचा एक भाग बनून मला खूप आनंद होत आहे. मला शिक्षणाचं महत्त्व सांगायचं आहे. 2030 पर्यंत सर्वांना शिक्षण देण्याच्या लक्ष्यावर आम्ही काम करत आहोत. G20 मध्ये भारत आघाडीवर आहे. भारताला शिक्षण आणि संस्कृतीत कशी प्रगती करायची आहे, हे मला जाणून घ्यायचं आहे.

देशवासीयांच्या क्षमतेची झलक

माझा ठाम विश्वास आहे की, सामूहिक प्रयत्नांनी सर्वात मोठा बदल घडवून आणू शकतो. आम्ही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकडं वाटचाल करत असताना, आम्ही G20 चं अध्यक्षही आहोत. आम्ही मन की बातचा 100 वा भाग पूर्ण करत आहोत. प्रत्येक एपिसोडमध्ये देशवासीयांच्या सेवेची आणि कर्तृत्वाची झलक पाहायला मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com