Karnataka : काँग्रेसनं 91 वेळा मला शिव्या दिल्या, त्यांनी आंबेडकर-सावरकरांनाही सोडलं नाही; मोदींचा हल्लाबोल

मला कर्नाटकसाठी आणखी सेवा करायची आहे. कर्नाटकच्या विकासासाठी पूर्ण बहुमत असलेलं कायमस्वरूपी सरकार हवं आहे, असंही मोदींनी सांगितलं.
PM Narendra Modi Visit Bidar
PM Narendra Modi Visit Bidaresakal
Summary

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.

Karnataka Assembly Election 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिदर, हुमनाबाद (कर्नाटक) इथं जाहीर सभेला (PM Narendra Modi Visit Bidar) संबोधित केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

मोदी म्हणाले, 'या विधानसभा निवडणुकीत मी बिदरमधून प्रचाराला सुरुवात करत आहे, हे माझं भाग्य आहे. आज इतक्या मोठ्या संख्येनं इथं येऊन तुम्ही संपूर्ण देशाला संदेश दिलाय की, यावेळीही भाजपच सरकार आहे. ही निवडणूक कर्नाटकला देशातील नंबर-1 राज्य बनवण्याची निवडणूक आहे.'

PM Narendra Modi Visit Bidar
Bazar Samiti Result : पंढरपूर बाजार समितीवर भाजपच्या माजी आमदाराचं वर्चस्व; 18 उमेदवार विजयी

काँग्रेसवर निशाणा साधत मोदी म्हणाले, त्यांनी मला 91 वेळा शिवीगाळ केली, पण प्रत्येक वेळी जनतेनं त्यांना नाकारलं. सामान्य माणसाबद्दल बोलणाऱ्या, भ्रष्टाचार उघड करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा काँग्रेस तिरस्कार करतं. मोठमोठे महापुरुषही त्यांच्या तिरस्काराचे बळी ठरले आहेत. त्यांच्या (काँग्रेस) शिव्या खाणारा मी एकटाच नाहीये. त्यांनी बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर यांसारख्या महापुरुषांना शिव्या दिल्या. तेच लोक मोदींनाही शिव्या देत आहेत. मात्र, काँग्रेसनं मला किती जरी शिव्या दिल्या, तरी मी जनतेसाठी काम करत राहीन. मला कर्नाटकसाठी आणखी सेवा करायची आहे. कर्नाटकच्या विकासासाठी पूर्ण बहुमत असलेलं कायमस्वरूपी सरकार हवं आहे, असंही मोदींनी सांगितलं.

PM Narendra Modi Visit Bidar
Bazar Samiti Result : 'या' तीन आमदारांनी करुन दाखवलं! जावळी-महाबळेश्वरात 'मविआ'चा केला सुपडासाफ

कर्नाटकात गेल्या पाच वर्षात सामान्य माणसानं किती विकास केला, हे आपण पाहिलं आहे. तुमची ही स्वप्नं पूर्ण करण्याचं काम भाजपनं हाती घेतलं आहे. कर्नाटकला देशातील नंबर 1 राज्य बनवायचं असेल, तर इथं डबल इंजिनचं सरकार असणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा आम्ही पीएम किसान सन्मान निधीची सुरुवात केली, तेव्हा कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचं सरकार होतं. त्यांनी लाभार्थी शेतकर्‍यांची यादी केंद्र सरकारला पाठवली नाही. इतका शेतकऱ्यांचा द्वेष कशासाठी? छत्तीसगड आणि राजस्थानच्या शेतकऱ्यांना त्यांनी दिलेली आश्वासनं अद्याप पूर्ण झालेली नाहीत, असाही मोदींनी हल्लाबोल केला.

PM Narendra Modi Visit Bidar
Live Updates Bazar Samiti Result : सांगलीत 'मविआ'कडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम; मंत्री, खासदार मैदानात उतरुनही झाला पराभव

कर्नाटकात 10 मे रोजी मतदान

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. मे 2018 मध्ये इथं विधानसभेची शेवटची निवडणूक झाली होती. कर्नाटकात विधानसभेच्या 224 जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 104 जागा मिळाल्या होत्या. तर, काँग्रेसनं 80 आणि जेडीएसनं 37 जागा जिंकल्या. मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com