टीकाकारांनो कपडे काढा अन् नागडं नाचा- पर्रीकर

वृत्तसंस्था
बुधवार, 21 डिसेंबर 2016

काहीजणांना त्यांच्या मर्यादा कळत नाही ते उगाच बडबडत बसतात. त्यामुळे माझा त्यांना हा एक चांगला सल्ला आहे. 

पणजी - सरकारवर टीका करणाऱ्या टीकाकारांना माझा सल्ला आहे, की त्यांना स्वतःचे कपडे काढून सर्व जनतेसमोर नागडं नाचावं, असे वादग्रस्त वक्तव्य संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले आहे.

उत्तर गोव्यातील सत्तारी येथे भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना पर्रीकर यांनी हे वक्तव्य केले. गोव्यातील टीकाकार पत्रकारांनी सरकारविरोधात कितीही परखडपणे लिखाण उगाच वायफळ बडबड करू नये असे पर्रीकर यांनी म्हटले आहे. 

पर्रीकर म्हणाले, की टीका करणाऱ्या पत्रकारांनी कपडे काढून नागडं नाचावं. मला आठवतंय की 1968 मध्ये अमेरिकेतील वॉटरगेट घोटाळ्याबाबत एका संपादकाने अग्रलेख लिहिला होता. तो तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना उद्देशून होता. मला सांगा मराठीत लिहिलेला हा अग्रलेख त्यांच्यापर्यंत कसा काय जाणार? निक्सन तर अमेरिकेत होते. काहीजणांना त्यांच्या मर्यादा कळत नाही ते उगाच बडबडत बसतात. त्यामुळे माझा त्यांना हा एक चांगला सल्ला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manohar Parrikar has a advice for Goan Media critics: Take off clothes and dance naked