दिल्लीतील आयडीएसए संस्थेला  मनोहर पर्रीकर यांचे नाव 

पीटीआय
Wednesday, 19 February 2020

सरकारी थिंक टॅंक मानल्या जाणाऱ्या येथील इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड अॅनालिसिस (आयडीएसए) या संस्थेला माजी केंद्रीय संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे.

नवी दिल्ली - सरकारी थिंक टॅंक मानल्या जाणाऱ्या येथील इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड अॅनालिसिस (आयडीएसए) या संस्थेला माजी केंद्रीय संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे. पर्रीकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून आयडीएसएचे नामकरण मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड अॅनालिसिस असे करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भाजपचे नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री असलेले पर्रीकर हे २०१४ ते २०१७ या काळात देशाचे संरक्षणमंत्री होते. मागील वर्षी १७ मार्च रोजी कर्करोगाने त्यांचे पणजी येथे निधन झाले. पर्रीकर यांच्या संरक्षणमंत्रिपदाच्या काळात पठाणकोट आणि उरी येथे दहशतवादी हल्ले झाले होते. त्या वेळी पर्रीकर यांनी मोठे धैर्य दाखवून धाडसीपणे या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले होते. सार्वजनिक जीवनात काम करताना समर्पण आणि सातत्य यांचे उदाहरण घालून देत पर्रीकर यांनी सदैव लढाऊवृत्तीचे दर्शन घडविले, असे निवेदनात म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manohar Parrikar name to IDSA Institute in Delhi