esakal | Paytm, Zomato, Disney+ HotStar सह अनेक अ‍ॅप्स डाऊन; युजर्स वैतागले!
sakal

बोलून बातमी शोधा

Paytm, Zomato, Disney+ HotStar सह अनेक अ‍ॅप्स डाऊन; युजर्स वैतागले!

Paytm, Zomato, Disney+ HotStar सह अनेक अ‍ॅप्स डाऊन; युजर्स वैतागले!

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : Paytm, Zomato, Sony Liv, Hotstar, प्ले स्टेशन नेटवर्क यांसारखी अनेक अॅप्स गुरुवारी संध्याकाळपासून डाऊन झाले आहेत. जगभरातील युजर्सना या समस्येला सामोरं जाव लागलं. हे कशामुळं झालंय याचं ठोस कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण काही बातम्यांमधून हे समोर आलंय की, ही समस्या अकामाई वेब इन्फ्रास्ट्रक्चरमुळे निर्माण झाली आहे. (Many apps down with Paytm Zomato Disney HotStar aau85)

इंटरनेट आउटेज ट्रॅकर डाउनडेक्टरच्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ८.५५ मिनिटांनी ही सर्व अॅप्स डाउन झाली. पाच मिनिटांमध्ये एकट्या झोमॅटोच्या अॅपवर ३००० लोकांना वापरता येत नव्हतं. याच प्रकारच्या अडचणी इतरही काही सेवा देणाऱ्या अॅप्सच्या बाबतीत पहायला मिळाल्या.

या आउटेजमध्ये NDTV च्या वेबसाईट्सना फटका बसला. असं सांगितलं जात आहे की, ही समस्या अकामाई इन्फ्रास्ट्रक्चरमुळं झाली आहे. हे इंटरनेटचा महत्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रदान करते. डाउनडेक्टरच्या माहितीनुसार, आउटेजचा परिणाम झालेल्या काही वेबसाईट्समध्ये लोकप्रिय गेमिंग अॅप स्टीम आणि पीएसएन, डिझ्ने, हॉटस्टार, झी ५ आणि सोनी लिव्ह सारख्या स्ट्रिमिंग सेवा आणि झोमॅटो, अॅमेझॉन आणि पेटीएम सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसचा समावेश आहे.

loading image