Maoist Commander Killed : तब्बल एक कोटींचा इनाम असलेल्या माओवादी कमांडरसह आठ नक्षलवाद्यांचा खात्मा!

Eight Naxalites killed including a Maoist commander : ही कारवाई कोब्रा आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने केली.
Security personnel stand at the encounter site after eliminating eight Naxalites, including a Maoist commander

Security personnel stand at the encounter site after eliminating eight Naxalites, including a Maoist commander

esakal

Updated on

Security Forces Eliminate Eight Naxalites in Encounter : झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील सारंडा जंगलात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत एक प्रमुख माओवादी कमांडर अनल दा उर्फ ​​तुफान ठार झाला. त्याच्यावर एक कोटी रुपयांचे बक्षीस होते. तसेच, या चकमकीत आठ माओवादी ठार झाल्याचे वृत्त आहे.

ही कारवाई कोब्रा आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने केली. गुरुवारी सकाळी पश्चिम सिंहभूममध्ये माओवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला. किरीबुरु पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सारंडा जंगलातील कुमडी येथे ही चकमक झाली. जोरदार गोळीबार झाला, ज्यामध्ये अनल दा याच्यासह आठ माओवादी ठार झाले.

अनल दा उर्फ ​​तुफानचे खरे नाव पतिराम मांझी उर्फ ​​पतिराम मरांडी उर्फ ​​रमेश होते. तो गिरिडीह जिल्ह्यातील पिरतांड पोलिस स्टेशन परिसरातील झरबाले गावचा रहिवासी होता. त्याच्या वडिलांचे नाव टोटो मरांडी उर्फ ​​तारू मांझी होते. अनल दा हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) किंवा सीपीआय (माओवादी) चे केंद्रीय समिती सदस्य (सीसीएम) होता.

Security personnel stand at the encounter site after eliminating eight Naxalites, including a Maoist commander
Lok Sabha Attendance Rules : अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून लोकसभेत खासदारांच्या हजेरीसाठी नवीन नियम होणार लागू!

 त्याला माओवादी रणनीतीकार मानले जात होते, तो संघटनेसाठी प्रमुख योजना आखत होतो. त्याच्यावर १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. अनल दा ठार होणे हे सुरक्षा दलांसाठी हे एक मोठे यश आणि माओवाद्यांना मोठा धक्का मानला जात आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com