
Latest Marathi Live Update News
esakal
रामटेकजवळील कांद्री माईन परिसरात सोमवारी सकाळी दुर्दैवी घटना घडली. भरधाव कारच्या भीषण धडकेत दोन शेतमजूर महिला मंदा उपासे (49) आणि प्रमिला शेंद्रे (41) यांचा जागीच मृत्यू झाला. दोघी पायी शेतात कामावर जात असताना कारने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून संतप्त नागरिकांनी कारला आग लावण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिकांच्या तत्परतेने आग वेळेत विझवण्यात आली. अपघातानंतर कारमधील कुणाल अहुजा, प्रशांत निसवानी आणि चालक सागर ठाकूर हे तिघेही वाहन टोलजवळ सोडून फरार झाले होते, परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. दुभाजक काढल्यामुळे वाढलेले अपघात, पथदिव्यांचा अभाव आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर नागरिकांनी जोरदार नाराजी व्यक्त केली. घटनास्थळी रामटेक SDPO रमेश बरकते यांनी पथकासह धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.