गर्भवती महिलांसाठी मातृवंदना योजना

नागेंद्र गवंडी
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

मातृ पूर्ण ही योजना लवकरच बंद करण्यात येणार असून गरभवती महिलांना पहिल्या बाळंतपणासाठी पाच हजार रुपये दिले जाणार आहेत. याचा महिलांना चांगला फायदा मिळणार आहे.
- ए.एस.हलसुडे, कार्यकारी अधिकारी, तालुका पंचायत.

बेळगाव : शासनाने गर्भवती महिलांसाठी आणि बाळंतणीना लागू करण्यात आलेली मातृपूर्ण योजना बंद करण्यात येणार असून याठिकाणी मातृवंदना ही योजना 1 जानेवारीपासून लागू करण्यात येणार आहे. प्रत्येक गर्भवती महिलेला तिच्या पहिल्या बाळंतपणाला शासनाकडून पाच हजार रूपये अनुदान दिले जाणार आहे. त्या महिलेच्या बॅंक खात्यावर ही अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे.

गर्भवती महिला व बाळंतणीच्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाने गेल्या चार महिन्यापासून मातृपूर्ण योजना सुरु केली आहे. पण, या योजनेचा लाभ घेण्याकडे महिलांनी पाठ फिरवली आहे. अंगणवाडीत जाऊन पौष्टिक जेवण जेवण्याचे लाभार्थीनी नापसंत केले आहे. तर महिलातून जेवण देण्याचे बंद करा अशी मागणी होती आहे. याचाच विचार करून शासनाने मातृवंदना ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून पहिल्या बाळंतपणासाठी पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या योजनेचा महिलांना अधिक फायदा होणार आहे. त्याचबरोबर मातृपूर्ण योजनेच्या माध्यमातून होणारी अन्नाची नासाडी हे रोखली जाणार आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांवरती पडलेला कामाचा भारही कमी होणार आहे. जिल्हा पंचायत तालुका पंचायत, तालुका पंचायत आणि प्रत्येक ग्राम पंचायतीच्या ग्रामसभेमध्ये मातृपूर्ण योजनेसंदर्भात महिलांतून विरोध होत आहे. महिलांना होणाऱ्या त्रासाबद्दल चर्चा होत आहे. प्रत्येक बैठकीमध्ये जेवण नको पैसे द्या, अन्यथा ड्रायफ्रूट द्या. अशी मागणी केली जात आहे. याचा विचार शासनाने घेतला असून महिलांना यापुढे त्यांच्या बॅंक खात्यावर शासनाकडून थेट पाच हजार रुपये जमा केले जाणार आहेत. केवळ महिलेला पौष्टीकर आहार घेण्यासाठी आणि त्यापासून बाळही सदृढ होण्यासाठीच हे अनुदान शासनाने देण्याचा निर्णय घेतला आहे.

मातृ पूर्ण ही योजना लवकरच बंद करण्यात येणार असून गरभवती महिलांना पहिल्या बाळंतपणासाठी पाच हजार रुपये दिले जाणार आहेत. याचा महिलांना चांगला फायदा मिळणार आहे.
- ए.एस.हलसुडे, कार्यकारी अधिकारी, तालुका पंचायत.

Web Title: Marathi news Belgaum news pregnant women scheme