''अरारिया मतदारसंघ दहशतवांद्याचा अड्डा बनेल''

पीटीआय
गुरुवार, 15 मार्च 2018

नवी दिल्ली : बिहारमधील अरारिया लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) उमेदवार सर्फराज अलाम यांचा विजय झाल्याने हा भाग दहशतवाद्यांचा अड्डा बनेल. ही बाब बिहारसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठीही घातक ठरेल, असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री गिरिराजसिंह यांनी गुरुवारी केले. 

गिरिराजसिंह यांच्या या विधानावर 'राजद'सह सर्व विरोधकांनी जोरदार हल्ला चढविला. ''भाजपचा त्यांच्या नेतृत्वावर विश्‍वास नसेल, तर त्यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा पाठिंबा काढून घ्यावा,'' असे आव्हान 'राजद'चे नेते तेजस्वी यादव यांनी दिले.

लोकसभेच्या पोटनिवडणुकीत बुधवारी (ता. 14) भाजपला मोठा फटका बसला. या पार्श्‍वभूमीवर बोलताना सिंह म्हणाले, की राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी 'राजद' नलक्षवादी विचारधारेने पुढे जाईल. राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी या पक्षाने नवीन राजकीय संस्कृती रुजविण्यास सुरवात केली आहे. त्यांची नक्षलवादी विचारधारा ही केवळ बिहारलाच नाही तर संपूर्ण देशाला धोकादायक ठरणार आहे. येथे दहशतवाद्यांचे अड्डे तयार होतील, असा दावा त्यांनी केला. 

गिरिराजसिंह हे केंद्रात मंत्री आहेत आणि बिहार व दिल्लीत त्यांचे सरकार आहे, हे त्यांना माहीत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. नितीशकुमार यांच्या नेतृत्वावर त्यांचा आणि भाजपचा विश्‍वास नसेल तर नितीशकुमार यांना पदावरून पायउतार होण्यास का सांगत नाही, किंवा त्यांचा पाठिंबा का काढून घेत नाही? नितीशकुमार यांच्यासाठी हे लज्जास्पद आहे. 
- तेजस्वी यादव, माजी उपमुख्यमंत्री, बिहार 

देशभरातील दहशतवादी भाजपच्या कार्यालयात बसतात. जनतेने उत्तर दिले आहे म्हणून ते गोंधळून गेले आहेत. बिहार आणि उत्तर प्रदेशमधील जनतेने त्यांना रस्ता दाखविला आहे. जिभेवर ताबा ठेवा आणि अरारियाच्या जनतेची माफी मागा, नाही तर 2019मध्ये जनता माफ करणार नाही. 
- राबडी देवी, माजी मुख्यमंत्री, बिहार 

कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सावधगिरी बाळगण्याची विनंती मी सरकारला करीत आहे. अरारियात केवळ मुसलमानच राहत नाहीत. मागासवर्ग जाती- जमातीचे लोकही तेथे आहेत. तेथे कुठे 'आयएसआय'चे अस्तित्व आहे? 
- जीतनराम मांझी, माजी मुख्यमंत्री, बिहार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Bihar Bypolls RJD Giriraj Singh