कर्तृत्वान महिलांचा 'फर्स्ट लेडी'ने सन्मान 

पीटीआय
रविवार, 21 जानेवारी 2018

नवी दिल्ली : विविध क्षेत्रांत सर्वोच्च स्थान भूषविणाऱ्या व विक्रम प्रस्थापित करणाऱ्या देशातील 112 कर्तृत्वान महिलांना 'फर्स्ट लेडी' पुरस्काराने शनिवारी गौरविण्यात आले. केंद्रीय महिला व बालविकासमंत्री मेनका गांधी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 

अनवट वाट चोखाळून आपल्या क्षेत्रात शिखर स्थान गाठलेल्या महिलांच्या सत्काराचा हा आगळा कार्यक्रम राष्ट्रपती भवनात आज आला. केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने त्याचे आयोजित केले होते. 'डीडी न्यूज' आणि फेसबुक यांनी यासाठी सहकार्य केले. कला, क्रीडा, साहित्य, उद्योग, शिक्षण आदी क्षेत्रांतील महिलांचा सन्मान या वेळी करण्यात आला.

यात पहिली एव्हरेस्टवीर महिला बचेंद्री पाल, भारतीय लष्करातील पहिली महिला प्रिया हिंगण, ऑलिंपिकमध्ये प्रथमच रौप्यपदक मिळविलेली महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, अपंगांच्या ऑलिंपिकमध्ये प्रथमच पदक मिळविलेल्या दीपा मलिक आणि भारतातील सर्वांत तरुण व काश्‍मीरमधील पहिली महिला वैमानिक आयेशा अझिझ, मर्चंट नेव्हीतील पहिली महिला कॅप्टन राधिका मेनन, वेटलिफ्टिंगमध्ये पहिले ऑलिंपिक पदक मिळविणारी कर्नाम मल्लेश्‍वरी, पहिली महिला प्रवासी रेल्वेचालक सुरेखा यादव, जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकविजती पहिला महिला नेमबाज हीना सिंधू, द्रोणाचार्य पुरस्कार मिळविणारी पहिली महिला कबड्डी प्रशिक्षक सुनील डाबस, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतील ग्रॅड मास्टर किताबविजेती भाग्यश्री ठिपसे यांना या 'फर्स्ट लेडी' पुरस्काराने गौरविण्यात आले. 

फ्लाइंग ऑफिसर भावना कांत, भारतीय हवाई दलातील लढाऊ विमानाच्या महिला वैमानिकांच्या पहिल्या तुकडीतील अवनी चतुर्वेदी, मोहना सिंग, महिला सरपंच छावी राजावत, फॉर्म्युला वन स्पर्धेतील पहिली महिला रेसर अलिशा अब्दुल्ला, 'बायोकॉन' कंपनीची उलाढाल एक अब्ज डॉलरवर पोचविणाऱ्या महिला उद्योजिका किरण मुजुमदार शॉ यांचाही सन्मान मेनका गांधी यांनी या वेळी केला.

''तुमचे यश हे अन्य महिलांना वेगळ्या वाटेकडे जाण्यासाठी प्रेरणादायी ठरेल; तसेच देशासाठीही ते अभिमानास्पद आहे,'' अशा शब्दांत मेनका गांधी यांनी या असाधारण कामगिरी केलेल्या महिलांचे कौतुक करून स्वागत केले. अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री हरसिमरत कौर बांदल यांनीही या 'फर्स्ट लेडीं'चे अभिनंदन करीत तुम्हाला अधिकाधिक यश मिळो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. 

ऐश्‍वर्याची उपस्थिती 
महिलांच्या सत्काराच्या या कार्यक्रमास अभिनेत्री ऐश्‍वर्या राय-बच्चन हिची उपस्थिती लक्षवेधक ठरली. माजी 'मिस अर्थ'निकोल फारियाही या कार्यक्रमात सहभागी झाली होती. या दोघींनी या कर्तृत्वान महिलांशी संवाद साधला. या महिलांच्या देदीप्यमान कामगिरीची नोंद असलेल्या पुस्तकाचेही या वेळी प्रकाशन झाले. 

भारतातील महिलांना अनेक प्रकारची आव्हाने पेलावी लागतात. आपपल्या क्षेत्रांत प्रथम स्थान मिळवणे हेही अनेक महिलांसाठी आव्हानात्मक आहे. ते तुम्ही करून दाखविले आहे. हे आपण करू शकतो हे तुम्ही दाखवून दिले आहे. 
- हरसिमरत कौर बांदल, केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Delhi News First Lady Award Maneka Gandhi